Ramesh Kadam Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ramesh Kadam : माजी आमदार रमेश कदमांना २४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

Solapur News : आण्णा भाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष असताना पदाचा केला होता गैरवापर

सरकारनामा ब्युरो

Maharashtra Politics : आण्णा भाऊ साठे महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष माजी आमदार रमेश कदम यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून महामंडळाच्या निधीचा अपहार केला. हे प्रकरण २०१४ मधील असून फिर्याद २०१७ साली दाखल झाली आहे. आरोपीस पोलिसांनी जवळपास सहा वर्षांनी न्यायालयासमोर हजर केले, याकडे वकिलांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. त्यावर न्यायालयाने कदमांना २४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली.

काय आहे प्रकरण

अण्णा भाऊ साठे महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष माजी आमदार रमेश कदम (Ramesh Kadam) यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला. त्यातून त्यांनी महामंडळाच्या निधीचा अपहार केला. रमेश कदम (Ramesh Kadam) यांनी त्यांची आजी श्रीमती बायमा गणपत क्षीरसागर (रा. नांदणी, ता. बार्शी, जि. सोलापूर) यांच्या नावाने दुग्ध व्यवसायाचे कर्ज मंजुरीचे बेकायदेशीर आदेश तयार केला. कर्ज मंजूर केलेले आहे, असे खोटे भासवून ते खरे म्हणून वापरले.

सदरचे आदेश मंजुरीसाठी महामंडळाचे कर्मचारी लक्ष्मण कांबळे व इतरांवर दबाव टाकला. त्यानुसार चार लाख ७५ हजार रुपयांचा धनादेश पास करून घेतला. त्यावरून महामंडळाची व सरकारची फसवणूक केल्याची फिर्याद अनिल राघोबा म्हस्के यांनी ३१ मे २०१७ रोजी सदर बाजार पोलीस ठाण्यात दिली होती.

पोलिसांनी माजी आमदार रमेश कदम (Ramesh Kadam) यांना आज न्यायालयासमोर हजर केले. त्यावेळी या प्रकरणाच्या तपासासाठी पाच दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. आरोपी माजी आमदार रमेश कदम यांच्यातर्फे युक्तिवाद करताना वकिलांनी न्यायलयाच्या निदर्शनास हे प्रकरण जुने असल्याचे निदर्शनास आणून दिले.

ही घटना २०१४ सालातील आहे. त्या प्रकरणील फिर्याद २०१७ साली दाखल आहे. त्यानंतर आरोपीस पोलिसांनी जवळपास सहा वर्षांनी न्यायालयासमोर हजर केले, असा युक्तिवाद वकिलांनी केला. त्यावर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. पांढरे यांनी आरोपस २४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

यात आरोपीतर्फे अॅड. मिलिंद थोबडे, अॅड. विनोद सूर्यवंशी यांनी तर सरकारतर्फे अॅड. अल्पना कुलकर्णी यांनी काम पाहिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT