इचलकरंजी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांचा रविवारचा कोल्हापूर दौरा इचलकरंजी (Ichalkaranji) राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) धक्का देणारा ठरला. गेल्या आठ वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षपदावर कार्यरत असलेले माजी नगरसेवक प्रकाश पाटील (Prakash Patil) यांनी आज (ता. १९ फेब्रुवारी) शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला. त्यांच्यासमवेत राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका अनिता कांबळे, शहर सरचिटणीस बाजीराव कुंभार यांनीही राष्ट्रवादीला रामराम करीत शिवसेनेचे धनुष्यबाण हातात घेतले. (NCP's Ichalkaranji city president Prakash Patil joins Shiv Sena)
कोल्हापूर येथील गंगावेश येथे आज झालेल्या एका कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थीतीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला. शिवसेनेचा स्कार्फ घालून त्यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. या प्रसंगी कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार धैर्यशील माने, माजी आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख रविंद्र माने आदी उपस्थीत होते.
माजी नगरसेवक पाटील हे राष्ट्रवादीचे खंदे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. दोन वेळा ते इचलकरंजी नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तर गेली आठ वर्षे शहराध्यक्ष पदाचा कार्यभार त्यांनी यशस्वीपणे सांभाळला होता. मात्र गेल्या काही काळापासून ते नाराज असल्याची चर्चा होती. आज त्यांनी आकस्मीकपणे पक्षाच्या पदाच्या राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे देत असल्याचे सोशल मिडियातून जाहीर केले. त्यानंतर थोड्याच वेळात त्यांचा शिवसेना पक्षप्रवेश झाला.
दरम्यान, यावेळी महाज मुल्ला, हेरवाड ग्राम पंचायत सदस्या छाया सुर्यवंशी, ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख माधुरी साखरे, कनवाडच्या ग्राम पंचायत सदस्या आसमा पटेल यांनीही शिवसेनेत प्रवेश केल्याचे जिल्हाप्रमुख शिंदे यांनी सांगितले.
आवाडेंचा भाजप प्रवेश झालाच नाही
कोल्हापूर दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थीतीत आमदार प्रकाश आवाडे यांचा भाजप प्रवेश होत असल्याची चर्चा सोशल मीडियातून सुरु झाली होती. थोड्या वेळात राहुल आवाडे व मौश्मी आवाडे हे दोघेही भाजपमध्ये जात असल्याची माहिती प्रसारीत झाली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पक्षप्रवेशाला महत्व येणार असल्याने या घडामोडीकडे इचलकरंजीसह परिसराचे लक्ष लागले होते. प्रत्यक्षात मात्र कोणाचाच पक्षप्रवेश झाला नसल्याचे सायंकाळी स्पष्ट झाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.