Former MP Sanjay Patil BJP joining news, Ravindra Chavan and chandrakant patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sanjaykaka Patil Rejoin BJP : राष्ट्रवादीत न रमलेल्या माजी खासदार संजयकाका पाटील यांचा भाजपप्रवेश निश्चित, घरवापसीची तारीखही ठरली

NCP Setback in Sangli : राज्यात एकीकडे महायुतीचे सरकार असतानाच दुसरीकडे तिन्ही पक्ष आपली ताकद वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसत आहेत.

बलराज पवार

Sangli News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जीव न रमलेल्या माजी खासदार संजय पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 30 जून रोजी त्यांचा मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विटा येथील दौऱ्यात यावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.

2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्याच वर्षी नोव्हेंबरमधील विधानसभा निवडणुकी वेळी संजय पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेले आणि त्यांनी तासगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र तेथेही त्यांना पराभव पत्करावा लागला. मात्र, आमदार रोहित पाटील यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.

त्यानंतर मात्र ते काही राष्ट्रवादीत रमले नाहीत. ते भाजप प्रवेशासाठी धडपडताना दिसले. यानंतर त्यांनी तासगाव नगरपालिका तसेच तासगाव पंचायत समितीमध्ये सत्ता आणून पुन्हा एकदा आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली.

दरम्यानच्या काळात माजी खासदार संजय पाटील पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करण्यास उत्सुक होते. मात्र त्यांचा प्रवेश लांबला होता. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर अध्यक्ष निवडी वेळीही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार भाजपला साथ दिली.

त्यानंतर त्यांचे भाजपशी जवळीक पुन्हा वाढली. त्यांचा प्रवेश होत नव्हता. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही संजय काका आमच्या सोबत आहेत. मात्र त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत मुख्यमंत्री फडणवीसच निर्णय घेतील असे स्पष्ट केले होते.

दरम्यान, सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे शनिवारी कराड येथे आले होते. तेथे त्यांची माझे खासदार संजय पाटील यांच्याशी भेट झाली. त्यानंतर दुपारी पुन्हा विट्यातही त्यांची भेट झाली आणि भाजप प्रवेशाबाबत चर्चा झाल्याचे समजते.

या भेटीत संजयकाका पाटील यांचा 30 जून रोजी मुंबई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश होण्याबाबत चर्चा झाली. यावेळी संजयकाका पाटील यांनी, विकास कामांना गती देण्यासाठीच आपण भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला असून दि. ३० जून रोजी मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश करणार असल्याची माहिती दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT