Sanjaykaka Patil : 'उपायुक्त साबळे छोटा मासा, पण त्यांचां 'आका' कोण?; माजी खासदारांच्या निशान्यावर माजी आयुक्तांसह जिल्ह्यातील नेता?

Vaibhav Sable Case : सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका उपायुक्त वैभव साबळे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. 24 मजली इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी सात लाख रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून त्यांना अटक झाली आहे.
Sangli Vaibhav Sable bribery Case
Sangli Vaibhav Sable bribery Casesarkarnama
Published on
Updated on

Sangli News : सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांच्यावर कारवाई झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यानंतर आता नव्या आरोपांनी महापालिका क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते माजी खासदार संजयकाका पाटील यांनी देखील गंभीर आरोप केले आहेत. तसेच त्यांनी तत्कालिन आयुक्त शुभम गुप्ता यांच्या भ्रष्ट कारभाराची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे सांगताना साबळे यांचा आका कोण? असा सवाल केल्याने आता नव्याने याची चर्चा सुरू झाली आहे.

यावेळी संजयकाका म्हणाले, महापालिकेचे तत्कालिन आयुक्त शुभम गुप्ता यांचा कारभार भ्रष्ट होता. त्याबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यांनी मनमानी कारभार केल्याच्याही तक्रारी आहेत. त्यांच्याबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्र्यांकडे तक्रार करणार असून त्यांच्या कारभाराची चौकशी करण्याचीही मागणी करणार आहे. तर या प्रकारात उपायुक्त वैभव साबळे यांचा ‘आका’ कोण, हे शोधणेही आवश्यक असल्याचेही संजय पाटील म्हणाले.

महापालिकेतील प्रमुख अधिकाऱ्यास लाच प्रकरणात अटक करण्यात आली, ही गंभीर बाब आहे. अटक झालेले उपायुक्त वैभव साबळे हा छोटा मासा आहे, बडा मासा शोधून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आयुक्त म्हणून शुभम गुप्ता यांनी केलेल्या भ्रष्ट कारभाराबाबत बिल्डर्स, उद्योजक, ठेकेदारही आता खासगीत बोलू लागले आहेत. ‘आर्थिक तडजोडी’साठी त्यांनी काही माणसे नेमली होती, यात त्यांच्या स्वीय सहाय्यकांचाही समावेश आहे, अशा प्रकारच्या तक्रारी लोक आता करत आहेत. त्यामुळे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करायला हवी. तसेच गुप्तांसह आयुक्त कार्यालयातील स्वीय सहाय्यकांवरही कारवाई झाली पाहिजे. त्यासाठी लवकरच मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना भेटणार असल्याचेही संजयकाका पाटील म्हणाले.

Sangli Vaibhav Sable bribery Case
Sanjaykaka Patil : "तुमचे धंदे चालू देणार नाही"; संजयकाकांचा रोहित पाटलांना इशारा

विद्यमान आयुक्त सत्यम गांधी यांनी प्रशासनावर वचक बसवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ही चांगली बाब आहे. लवकरच त्यांची भेट घेणार असून पाण्याच्या स्मार्ट मीटरसाठी मी मंजूर करून आणलेले 15 कोटी रुपये पडून आहेत. या कामाची निविदा पारदर्शीपणे राबवावी व तातडीने हे काम सुरू करावे, अशी मागणी त्यांना करणार आहे. पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याचे पंचनामे करून त्यांना तातडीने शासनाने मदत देणे आवश्यक असल्याचे मत संजयकाका यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.

अज्ञानातून गुप्तांची पाठराखण

संजय पाटील म्हणाले, खासदार विशाल पाटील यांनी गुप्ता यांच्या पारदर्शी कारभाराचे समर्थन का केले होते? खासदार पाटील लोकप्रतिनिधी आहेत. कदाचीत त्यांना त्यावेळी गुप्ता यांच्या कारभाराची खरी माहिती समजली नसेल त्यामुळे अज्ञानातून त्यांनी त्यांची पाठराखण केल्याची शक्यता असल्याचे संजय पाटील म्हणाले.

Sangli Vaibhav Sable bribery Case
Sanjaykaka Patil : कवठे महांकाळमधील वादात मोठा ट्विस्ट; माजी खासदार संजयकाका पाटलांच्या विरोधातील तक्रार घेतली मागे

लोकप्रतिनिधीचे अपयश

दरम्यान संजयकाका यांनी, महापालिकेत बोकाळलेला भ्रष्टाचार हे लोक प्रतिनिधींचे अपयश आहे. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात खासदार, आमदार यांच्यासह दिग्गज नेते असताना या बँकेच्या इमारतीला बांधकाम परवाना देण्यासाठी महापालिकेचा अधिकारी लाच मागतोच कसा? आणि लाच दिली जातेच कशी? बँकेतील विश्वस्त असलेले लोक प्रतिनिधी काय करत होते? त्यांचा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांवर वचक नाही का? असे सवालही माजी खासदार संजय पाटील यांनी उपस्थित केले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com