Swabhimani Sanghtana, Raju Shetty
Swabhimani Sanghtana, Raju Shetty Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कोणीही गृहीत धरू नये!

हुकुम मुलाणी

मंगळवेढा : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) माध्यमातून राज्यात काम करणारे तीन पक्षाचे सरकार असो, वा केंद्रातील भाजप (BJP) सरकार यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास वेळ नाही. आरोप-प्रत्यारोप करून एकमेकांना अडकवणे, वस्त्रहरण करणे असे सगळे सुरु आहे. असा टोला शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी महाविकास आघाडी आणि भाजला लगावला. सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे कुणाचेच लक्ष नाही, शेतकऱ्याचा हुंकार बाहेर पडावा, म्हणून ही हुंकार यात्रा शेतकऱ्यांना जागृत करण्यासाठी काढली, असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

मंगळवेढ्यामद्ये ते बोलत होते. शेट्टी म्हणाले, की राज्यात भारनियमन सुरू आहे. केंद्र सरकार नेहमीच विरोधी पक्षाचे सरकार असलेल्या ठिकाणी दुजाभाव करते. हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. हा संघराज्याच्या एकूणच अस्तित्वाला धोका निर्माण करणारा विषय आहे. महाराष्ट्रात विरोधीपक्षाचे सरकार असल्यामुळे जीएसटी कर वाटा थांबविणे किंवा केंद्राच्या हातातील नैसर्गिक साधन संपत्तीचा पुरवठा थांबवणे, म्हणजेच अराजकतेला चालना देण्यासारखे आहे, त्याची किंमत देशाला निश्चित चुकवावी लागेल, अशा इशाराही त्यांनी दिला.

तसेच राज्य सरकार देखील निष्क्रिय आहे, राज्याने केंद्र शासनावर अवलंबून न राहता वार्षीक किती कोळसा लागतो? याचे नियोजन करून परदेशातून कोळसा आयात करणे आवश्यक होते, असेही त्यांनी सांगितले. संघटनेच्या भविष्यातील वाटचालीबाबत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कोणीही गृहीत धरू नये! कारण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उद्दिष्ट हे राजकारण करणे किंवा राजकारणातुन सत्ता स्थापन करणे नसून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे आहे. जो कोणी शेतकऱ्यांला फसवेल त्याला स्वाभिमानी शेतकरी संघटना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. सध्या राज्यांमध्ये राजकीय कुरघोड्या सुरू आहेत. हनुमान चालीसा, भोंगे असे प्रश्न उपस्थित करून विकासाच्या मुद्द्यांना बाजूला केले जात असून, राज्यातील जनता या गोष्टीला विटलेली आहे, असा हल्लाबोल शेट्टी यांनी केला.

यासाठीच मी बळीराजा हुंकार यात्रा काढली असून टीव्हीवर दररोज भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) व शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे चेहरे पाहावयास मिळतात, जनतेच्या प्रश्नावर काहीच बोलताना ते दिसत नाहीत. सध्या परीक्षेचा काळ सुरू असून महाविद्यालयाच्या परीक्षा सुरू आहेत. अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या प्रश्न व अडचणी माहिती झाल्या आहे. लॉकडाऊनच्या काळात आई-वडिलांचा रोजगार गेल्याने, त्यांचे शिक्षण अर्धवट राहिले आहे. अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले आहेत. यवतमाळच्या एका विद्यार्थ्याला वीस हजार रुपये फी न भरल्यामुळे शाळेतून हाकलून देण्यात आले. त्यामुळे तीने आत्महत्या केली, अशा अनेक आई-वडिलांशी हृदय तीळतीळ तुटत आहे, हे प्रश्न महत्त्वाचे नाहीत का? असा सवाल शेट्टी यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT