Kolhapur News: दूध उत्पादकांच्या तीव्र प्रतिक्रियानंतर गोकुळचे माजी अध्यक्ष आणि माजी संचालक अरुण डोंगळे यांना उपरती सुचली आहे. दोन दिवसापूर्वी माजी अध्यक्ष विश्वास पाटील हेच गोकुळचे बाप असल्याचे सांगत दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या होत्या. यानंतर झालेल्या चौफेर टिकेनंतर डोंगळे यांनी गोकुळ दूध संघाचा खरा बाप सांगितला आहे. यासंदर्भात त्यांनी व्हिडिओ प्रसारित करत आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला असल्याचा आरोप केला आहे.
गोकुळ दूध संघाच्या ठराव दाखल करण्याच्या अंतिम दिवशी माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांचे ठराव दाखल करण्यासाठी माजी अध्यक्ष अरुण डोंगळे देखील दाखल होते. यावेळी बोलताना गोकुळ दूध संघाचे बाप हे विश्वास पाटील आहेत, असं वक्तव्य केले होते. यानंतर समाज माध्यमांवर तीव्र संताप व्यक्त होताच डोंगळे यांनी गोकुळ दूध संघाचा माय बाप हा दूध उत्पादक शेतकरीच असल्याचा मान्य केले आहे.
आनंदराव पाटील चुयेकर यांनी संघ वाढविला त्यांचा नेहमीच आदर आहे. पण माझ्या या वक्तव्याचा चुकीचा विपर्यास करण्यात आला आहे. वयोमानानुसार आबाजी हेच बाप असल्याचं मी म्हटले होते. मात्र, माझ्या या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. गोकुळचे संस्थापक स्व. आनंदराव पाटील चुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत पाटील चुयेकरांना अध्यक्षपद मिळावा. म्हणून मी अजित नरकेंकडे राजीनामा दिला. तिथून पुढे काय झालं मला माहित नाही. असेही स्पष्ट केले.
दरम्यान, गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. गेल्या 30 ते 35 वर्षाच्या राजकारणात माजी अध्यक्ष डोंगळे आणि माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याकडे सर्वाधिक संस्था आहेत. त्याच्या जोरावरच त्यांचे गोकुळचे राजकारण अवलंबून आहे.
दोन दिवसांपूर्वी आपण जिकडे जाईल तिकडे विजय असतो. असं वक्तव्य करून स्वतःची प्रतिष्ठा वाढवून घेतली होती. मात्र याच याच संस्थाच्या जोरावर नेत्यांना वेठीस धरण्याचे काम डोंगळे व पाटील यांच्याकडून होतं असल्याची भावना दूध उत्पादक शेतकऱ्यांची आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.