

Kolhapur News: गेल्या 35 ते 40 वर्षांपासून सर्वसामान्य दूध उत्पादक आणि सभासदांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवून निवडून दिले. त्यांच्याच तोंडातून आता गोकुळचा सातबारा बदलण्याची भाषा होऊ लागली की काय? असा सवाल माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या वक्तव्याने उपस्थित होऊ लागला आहे.
माजी अध्यक्ष विश्वास पाटील हेच गोकुळचे बाप आहेत असं वक्तव्य करून डोंगळे आणि पाटील यांनी स्वतःची उंची वाढवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या संचालकांना कार्यवाहू म्हणून गोकुळमध्ये कारभार करण्याची संधी दिली. तेच आता गोकुळचे बाप म्हणत असतील तर त्याला सभासदांनी आणि दूध उत्पादक आणि काय उत्तर द्यावे?
गोकुळ दूध संघाची स्थापना झाल्यापासून हा संघ दूध उत्पादक शेतकऱ्यांचा राहावा यासाठी आनंदराव पाटील चुयेकर यांनी मोठे कष्ट घेतले. माजी आमदार महादेवराव महाडिक, दिवंगत आमदार पी. एन.पाटील, माजी संचालक अरुण नरके, काँग्रेस नेते सतेज पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह सर्वच नेत्यांनी हा गोकुळ दूध संघ सर्वसामान्य शेतकऱ्यांचा राहिला पाहिजे. दूध उत्पादक शेतकरी हाच आमचा माय बाप आहे. अशी भूमिका घेऊन गोकुळच्या राजकारणात सक्रिय होते व आहेत. मात्र माजी अध्यक्ष अरुण डोंगळे व विश्वास पाटील यांना गोकुळचा बाप बदलण्याचं कारण काय?
सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकरी शेणात हात घालून काबाडकष्ट करून दूध घालतो. त्यांच्या जीवावर तुमच्या अंगावरील शर्ट पांढरे फिटट झाले. तुमच्या बुडाखाली आलिशान गाड्या आल्या. दूध उत्पादक शेतकरीच हा गोकुळचा मायबाप असताना आपण स्वतःला बाप का म्हणवता?
एक प्रकारे माझे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी स्वतः आणि माजी अध्यक्ष विश्वास पाटील आबाजी यांचे महत्त्व वाढवत पाटील यांना बाप समजत सभासदांना आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना हिणवण्याचा प्रकार केला आहे.
गेल्या 35 ते 40 वर्षांपासून केवळ तुम्हाला विश्वस्त म्हणून गोकुळ दूध संघावर निवडून दिले जाते. संचालक म्हणून तुम्ही गोकुळ दूध संघाचे कार्यवाहू आणि काळजीवाहू आहात. भले तुम्ही गोकुळला चांगल्या उंचीवर नेले असले तरी त्यामध्ये सिंहाचा वाटा हा दूध उत्पादक शेतकऱ्यांचा आहे. त्याच शेतकऱ्यांचे तुम्ही बाप व्हायला निघाला. ही गोकुळच्या आजच्या राजकारणातील शोकांतिका आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.