Sujit Minchekar-Uddhav Thackeray Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : उद्धव ठाकरेंना कोल्हापुरात पुन्हा धक्का; माजी आमदार बंडाच्या तयारीत, शिंदे गटाच्या गळाला लागणार?

Rahul Gadkar

kolhapur, 26 August : कोल्हापूर जिल्ह्यातील दहा पैकी सहा मतदार संघात उमेदवारीवरून महायुती आणि महाविकास आघाडीत बंडाळी माजली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत जागा कोणाला जाणार, यावरूनच महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अनिश्‍चिततेचे वातावरण आहे. सध्या दोन्ही आघाडींकडे सहा मतदारसंघांत बंडखोरीची शक्यता जास्त आहे.

विद्यमान आमदार ज्या पक्षाचा त्याला तो विधानसभा मतदार संघ असे सूत्र निश्चित झाले आहे. त्यामुळे महायुतीला गळती लागली आहे. या सूत्रानुसार आता महाविकास आघाडीलाही गळती लागण्याची शक्यता आहे. हातकणंगलेचे माजी आमदार सुजित मिणचेकर (Sujit Minchekar ) शिंदे गटात जाण्याच्या तयारीत आहे. त्या संदर्भात येत्या दोन दिवसांत निर्णय होणे शक्य आहे.

हातकणंगले विधानसभा मतदारसंघामध्ये (Hatkanangle Assembly Constituency) काँग्रेसचे राजू आवळे हे विद्यमान आमदार आहेत. महाविकास आघाडीचे शिवसेनेचे माजी आमदार सुजित मिणचेकर, राष्ट्रवादी पवार गटाचे माजी आमदार राजीव आवळे हेही विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.

आघाडीच्या सुत्रानुसार ही जागा काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे माजी आमदार मिणचेकर अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत. पण अपक्ष निवडणूक लढवल्यानंतर तितकी ताकद लागणार नाही, हे लक्षात आल्यानंतर मिणचेकर वेगळा पर्याय निवडण्याच्या तयारीत आहेत.

महाविकास आघाडीत हा मतदारसंघ कोणाकडे जाणार, यावरून अनेक चर्चा असली तरी माजी आमदारांमध्ये उमेदवारीवरून प्रचंड सुरस निर्माण झाले आहे. शिवसेनेचे माजी आमदार सुजित मिणचेकर हे सध्या नाराज असून ते लवकरच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. शिवसेना शिंदे गट आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाला धक्का देण्याच्या तयारीत आहे.

शिवसेनेचे माजी आमदार सुजित मिणचेकर हे उद्धव ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत असून त्यांची शिंदे गटात जाण्यासाठी तयारी सुरू झाली आहे. आज ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत चर्चा करणार आहेत. सकारात्मक चर्चा झाली, तरच विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागणार आहेत; अन्यथा मिणचेकर बंड करण्याच्या मानसिकतेत आहेत. आज त्याबाबत मातोश्रीवर जाऊन निर्णय देणार आहेत. अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT