Rohit Pawar : कर्जत-जामखेड सोडून मी कोठेही जाणार नाही; रोहित पवारांनी दिले स्पष्टीकरण

Karjat-Jamkhed Assembly Election : कर्जत-जामखेडच्या जनतेने मला लढायला शिकवलं आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी आणि विचारांसाठी भल्या भल्याबरोबर मी भिडायला तयार आहे.
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 26 August : मी कधीही कर्जत-जामखेड सोडणार नाही. काहीही झालं तर मी कर्जत-जामखेड मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार आहे. जनतेच्या पाठिंब्याने आणि आशीर्वादाने मला विश्वास आहे की, मागच्या मताधिक्यापेक्षा अधिकचे मताधिक्य घेऊन निवडणुकीत मी विजयी होईन, असा विश्वासही रोहित पवार यांनी बोलून दाखवला.

आमदार राेहित पवार (Rohit Pawar) यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांना तुम्ही बारामतीतून निवडणूक लढवणार आहात का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्या वेळी त्यांनी आपण कर्जत जामखेड मतदारसंघ सोडून कोठेही निवडणूक लढविण्यासाठी जाणार नाही, असे स्पष्ट केले.

कर्जत-जामखेड मतदारसंघात झालेल्या माझ्या मेळाव्याला माझ्या सर्व बहिणी प्रेमाने आल्या होत्या. मोदींच्या जळगावच्या मेळाव्यात मात्र पाचशे रुपये देऊन महिला आणल्या होत्या, असा आरोपही रोहित पवार यांनी महायुतीच्या जळगावमधील मेळाव्याबाबत बोलताना केला.

Rohit Pawar
Rohit Pawar : ‘राजसाहेब, तुम्ही महाराष्ट्र धर्मावर विश्वास ठेवणारे नेते...तेवढं फक्त होऊ देऊ नका’; रोहित पवारांची ठाकरेंना विनंती

ते म्हणाले, जळगावच्या मेळाव्यात मोदी यांनी एक विधान केलं की, महिलांवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला सोडू नका. त्याला मदत करणाऱ्या लोकांनाही सोडू नका. याचा अर्थ त्यांचा महायुती सरकारवरच विश्वास राहिलेला नाही. कारण, या सरकारने लोकसभा निवडणुकीत गुंडांचा वापर काय पद्धतीने केलेला आहे, हे आपण सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे आता मोदी यांनीच राज्यात बदल होईल.

रोहित पवार म्हणाले कर्जत-जामखेड मतदारसंघात माझ्या विरोधात ज्यांना कोणाला निवडणुकीला उभे राहायचे आहे, त्यांनी उभं राहावं. मतं खाण्यासाठी किती लोकांना उभं करायचं आहे, तेवढ्या लोकांना उभं करावं. काही केलं तरी कर्जत-जामखेडमधील लोकांवर माझा विश्वास आहे.

Rohit Pawar
BJP Operation Lotus: काँग्रेस आमदाराला फोन, भाजपाला हवे आहेत 50 आमदार विकत; पुन्हा 'ऑपरेशन लोटस', सरकार पाडण्यासाठी 100 कोटींची ऑफर

कर्जत-जामखेडच्या जनतेने मला लढायला शिकवलं आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी आणि विचारांसाठी भल्या भल्याबरोबर मी भिडायला तयार आहे, असे प्रतिआव्हान रोहित पवार यांनी विरोधकांना दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com