Pune News : कोणकणात सध्या ऑपरेशन टायगर सुरू असून शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पाडले जात आहे. अशातच ठाकरे गटाचे काही नेते एकाकी टक्कर देत असतानात माजी आमदार वैभव नाईक यांना लाचलुचपत विभागाने नोटील बजावली आहे. त्यांच्यासह त्यांच्या पत्नी स्नेहा नाईक यांना देखील एसीबीने चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश काढले आहेत. यामुळे कोकणात सध्या कळबळ उडाली असून 11 फेब्रुवारीला कागदपत्रांसह चौकशीला हजर राहण्याच्या सूचना एसीबीने दिल्या आहेत.
कोकणात उरली सुरली ठाकरे शिवसेना देखील संपवण्याचे काम ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून उद्योग मंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू आमदार किरण सामंत करत आहेत. सध्या येथील ठाकरे गटाचे दोन आमदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असून माजी आमदार राजन साळवी देखील भाजपच्या मार्गावर आहेत. आता अशातच आता रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह त्यांच्या पत्नी स्नेहा नाईक यांना नोटील बजावली आहे.
याआधी देखील अशीच नोटीस माजी आमदार राजन साळवी यांना काढण्यात आली होती. तर त्यांच्या मागे लागेला एसीबीचा ससेमीरा अद्याप थांबलेला नाही. यामुळे कंटाळून ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत राजन साळवी असल्याचे बोलले जात आहे. यानंतर आता माजी आमदार वैभव नाईक यांना एसीबीने रडारवर घेतले असून त्यांच्या मागे देखील एसीबीचा ससेमीरा लागण्याची शक्यता आहे. यामुळे आगामी काळात कोकणात ठाकरे गटाला हा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
एसीबीने पाठवलेल्या नोटीसमध्ये HUF व नाईक स्टोन इंडस्ट्रीजबाबत विचारणा करण्यात आली असून याच मालमत्ता प्रकरणी वैभव नाईक आणि स्नेहा नाईक यांना चौकशीची नोटीस काढण्यात आली आहे. त्यांना 11 फेब्रुवारीला उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
वैभव नाईक आणि स्नेहा नाईक यांना 1/1/2002 ते 29/9/2022 या कालावधीतील उत्पन्न, खर्च व मालमत्तेची माहितीसह या कालावधीत आयकर विवरणपत्रे, ऑडीट रिपोर्ट, कॉम्प्युटेशन ऑफ इनकम, शेडयुल बॅलन्सशीट, प्रॉफीट अॅन्ड लॉस अकाऊंट डिटेल्स शेडयुल व त्यासंबधीत कागदपत्रांसह सादर करायची आहेत.
दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नोटीसनंतर वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, याआधी देखील आपण प्रशासनाला सहकार्य केलं होतं. आताही करू. पण दबावाला बळी पडणार नाही. सध्यातरी पक्ष प्रवेशासाठी कोणाकडून ऑफर नाही. मात्र जरी आल्या तरी स्वीकारणार नाही. मी निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि निष्ठावंत म्हणून राहीन, असेही वैभव नाईक यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.