
Mumbai News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश करण्याची ऑफरचा गौप्यस्फोट केला आहे.
"एकनाथ शिंदे यांचे आमदार भरत गोगावले यांनी दसरा मेळाव्यादिवशी फोन करून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेशाची ऑफर दिली होती. पण मी स्वार्थासाठी तिकडे गेलो नाही. तसंच नीलेश राणे यांचा नाव न घेता, त्यांचा प्रवेश घेतला नसल्याचे दावा माझ्याशी बोलताना केला होता", असे वैभव नाईक यांनी म्हटले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण विधासभा मतदारसंघातून शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वैभव नाईक यांचा पराभव झाला आहे. या पराभवावर वैभव नाईक यांनी खचून गेल्याची भावना व्यक्त केली. थांबण्याचा निर्णय घेतला होता. पण सर्वसामान्य जनतेचा लोकप्रतिनिधी आहे. जनता खचली नाही, तर मी का खचू, असे सांगून पुन्हा नव्या ताकदीने उभे राहिल्याचे वैभव नाईक यांनी आभार मेळाव्यात सांगितले.
वैभव नाईक यांनी पराभवाचे खापर पैसे वाटप किंवा ईव्हीएम (EVM) मशीनवर न फोडता, त्यांनी मतदानाच्या दिवशी विरोधकांनी बटण दाबा आणि खात्यात 2100 रुपये जमा करून घ्या, असा प्रचार केला. आता मात्र लाडक्या बहिणींना दिवाळीनंतर 2100 रुपये देणार असल्याचे आश्वासन होते. अद्याप दिले नाहीत. आता खरा संघर्ष सुरू झाला आहे. शिवसेनाला संघर्ष नवीन नाही. आता याचविरोधात आपण आवाज घुमणार असून, लाडक्या बहिणींना न्याय मिळून देणार असल्याचे सांगितले.
'माझ्या पराभवाने राज्यातील अनेक लोकांनी संपर्क करून दुःखाची भावना व्यक्त केली आहे. ते माझ्यासोबत आहे. हाच माझा विजय आहे. माझ्यासमोर राजकारणात, समाजकारणात यापुढे राहायचं की नाही, हा प्रश्न होता. मी कारण न देता पराभव स्वीकारला. जो जिता वही सिकंदर या भूमिकेतून आपण काम केलं पाहिजे', असेही वैभव नाईक यांनी म्हटले.
आमच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात काम केलं तर आम्ही रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा नीलेश राणेंना वैभव नाईक यांनी दिली. माझ्यासोबत 72 हजार लोक आहेत, त्यांना घेऊन रस्त्यावर उतरू, हे समोरच्यांनी लक्षात घ्यावे. चुकीच्या दबावाला बळी पडणार नाही. हिंदूहृयसम्राटांचे आशीर्वाद, उद्धव ठाकरेंचे पाठबळ आपल्याबरोबर असून, त्यातून कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना बळ देणार असल्याचे वैभव नाईक यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.