Ashok Nimbargi joins Congress
Ashok Nimbargi joins Congress Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Politic's : सोलापूर भाजपच्या माजी शहराध्यक्षाचा काँग्रेसमध्ये प्रवेश

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे सोलापूर माजी शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून शनिवारी (ता. २० मे) पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. प्रा. निंबर्गी यांनी आज अपेक्षेप्रमाणे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसला सोलापूर (Solapur) शहरात निवडणुकीच्या तोंडावर धक्का बसल्याचे मानले जात आहे. (Former Solapur BJP president Ashok Nimbargi joins Congress)

काँग्रेस (Congress) पक्षाचा हुतात्मा स्मृती मंदिरात निर्धार महामेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष पटोले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण व इतर नेत्यांच्या उपस्थितीत निंबर्गी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

प्रा. अशोक निंबर्गी हे गेल्या ३३ वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय होते. भाजपत ज्येष्ठ असलेले निंबर्गी हे गेल्या अनेक महिन्यांपासून पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळले होते. त्यातूनच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यांचे राजीनाम्याचे पत्र काँग्रेस पक्षाच्या महामेळाव्या पूर्वसंध्येला व्हायरल झाले होते.

दरम्यान, या मेळाव्यात बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोकसभेसाठी सुशीलकुमार शिंदे यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले. ते म्हणाले की, तुमची इच्छा असेल तर आगामी लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे उभे राहतील. पण, त्या निवडणुकीत ते बहुमताने निवडून आले पाहिजेत, ही जबाबदारी तुम्हाला घ्यायची आहे. तुम्हाला जबाबदारीच घ्यायची नसेल तर वारंवार या चांगल्या माणसाचा मी अपमान होऊ देणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT