Solapur News : काँग्रेसच्या मेळाव्यात नाराजीनाट्य : जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील कार्यक्रम सोडून निघून गेले…

त्यांनी फक्त व्यासपीठ सोडले नाही तर कार्यक्रमातून निघून जाणे पसंत केले.
Dhavalsinh Mohite Patil
Dhavalsinh Mohite Patil Sarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : सोलापुरातील काँग्रेसला गटबाजी आणि नाराजी नवीन नाही. काँग्रेसच्या महानिर्धार मेळाव्यात आज (ता. २१ मे) त्याचा पुन्हा प्रत्यय आला. काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांना व्यासपीठावर एका कोपऱ्यात पुतळ्याच्या मागे खुर्ची देण्यात आली होती. जिल्हाध्यक्ष असूनही त्यांना एका कोपऱ्यात स्थान देण्यात आल्याने नाराज झालेले धवलसिंह मोहिते पाटील तडकाफडकी व्यासपीठ सोडून निघून गेले. (Congress Solapur district president Dhavalsinh Mohite Patil left the party meeting and left....)

दरम्यान, मी कुणावरही नाराज नाही. मला व्यासपीठावर बसायला खुर्ची होती. पण मला लग्नाला जायचे असल्यामुळे मी कार्यक्रम सोडून आलो, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी दिले.

Dhavalsinh Mohite Patil
Solapur Congress News : तुम्ही जबाबदारी घ्या; सुशीलकुमार शिंदे लोकसभेला उभे राहतील : पटोलेंचा काँग्रेस कार्यकर्त्यांना आदेश

सोलापूरच्या (Solapur) हुतात्मा स्मृती मंदिरात आज काँग्रेस (Congress) पक्षाच्या वतीने महानिर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या मेळाव्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे, आमदार प्रणिती शिंदे, जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील (Mohite Patil), शहराध्यक्ष चेतन नरोटे उपस्थित होते.

मेळाव्याच्या सुरूवातीलाच नाराजी नाट्य रंगले. काँग्रेस पक्षाचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासाठी व्यासपीठावर एका कोपऱ्याला पुतळ्याच्या पाठीमागे खुर्ची मांडण्यात आली हेाती. त्या खुर्चीवर मोहिते पाटील यांचे लेबल लावण्यात आले होते. कोपऱ्यातील अडगळीची जागा पाहून धवलसिंह मोहिते पाटील हे नाराज झाले. व्यासपीठावरील आसनव्यवस्था पाहून त्यांनी तडकाफडकी व्यासपीठ सोडले. त्यांनी फक्त व्यासपीठ सोडले नाही तर कार्यक्रमातून निघून जाणे पसंत केले. त्यामुळे सोलापूर काँग्रेसमधील नाराजीनाट्य पुन्हा चव्हाट्यावर आले आहे.

Dhavalsinh Mohite Patil
Anil Deshmukh News : तुरुंगाबाहेर आलेल्या अनिल देशमुखांनी पहिल्याच निवडणुकीत बाजी मारली : नरखेड ‘खरेदी विक्री’वर राष्ट्रवादीचा झेंडा

दरम्यान, राज्यस्तरावरून आलेल्या नेत्यांचा सत्कार करण्यासाठी जिल्हाध्यक्ष या नात्याने आयोजकांनी धवलसिंह मोहिते पाटील यांचे नाव पुकारले. मात्र, तोपर्यंत ते व्यासपीठावरून उतरून हुतात्मा स्मृती मंदिराच्या बाहेर पडले होते. त्यामुळे संबंधित नेत्याचा सत्कारही दुसऱ्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. मुळात अकरा वाजता सुरू होणारा मेळावा प्रचंड विलंबाने सुरू झाला आणि त्यानंतर त्यात असे नाराजीनाट्य रंगल्याने काँग्रेसच्या मेळाव्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.

Dhavalsinh Mohite Patil
Radhakrishna Vikhe Patil News : आमच्याच तहसीलदारांची आम्हाला लाज वाटते : महसूलमंत्री विखे पाटलांनी व्यक्त केली खंत

यासंदर्भात ‘सरकारनामा’शी बोलताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील म्हणाले की, आजचा महानिर्धार मेळावा हा सोलापूर शहर काँग्रेसचा हेाता. त्या मेळाव्यात माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांना बसायला जागा नव्हती, त्यामुळे मी त्यांना माझी जागा दिली. शहरातील कार्यक्रम असल्यामुळे स्थानिक नेते, पदाधिकारी आणि ज्येष्ठांना मानसन्मान मिळायला हवा, या हेतूने मी त्यांना माझी खुर्ची दिली.

Dhavalsinh Mohite Patil
Maharashtra Politic's : भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्राचे गुन्हेगार अन्‌ अपराधी आहेत : शिवसेना नेत्याचा हल्लाबोल

मला आज लग्नासाठी पुढं जावं लागणार होतं, त्यामुळे मी मेळाव्याला हजेरी लावून लग्नासाठी बाहेर पडलो. मी पक्षावर अथवा पक्षातील कुठल्याही नेत्यावर नाराज नाही. मला व्यासपीठावर खुर्ची उपलब्ध होती. मात्र, शहराचा मेळावा असल्यामुळे शहरातील लोकांना व्यासपीठावर जागा मिळावी म्हणून मी खाली आलो, असे मोहिते पाटील यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com