Sangli News : राज्यातल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जाहीर होण्याची शक्यता आहे. याआधीच महायुतीतील तिन्ही पक्षांसह महाविकास आघाडीतील मित्र पक्ष तयारीला लागले आहेत. दरम्यान मुंबईत मोठा राजकीय प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. ज्यामुळे सांगलीत भाजपसह ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. सांगलीतील चार माजी आमदारांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. यामुळे आता जिल्ह्यात अजित पवार यांची ताकद वाढली असून स्थानिकची पेरणीच अजितदादांनी केल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
सांगलीतील जतचे माजी आमदार विलासराव जगताप, कवठेमहांकाळचे माजी आमदार अजितराव घोरपडे,शिराळयाचे माजी आमदार शिवाजीराव नाईक,आटपाडीचे राजेंद्र देशमुख यांच्यासह जतचे माजी सभापती तमन्नगौडा रवी पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करून हातात घड्याळ बांधले. यामुळे सांगली जिल्ह्यातलं राजकार आता बदणार असून याचा थेट फटका जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकरांना बसणार असल्याचेही बोललं जात आहे.
दरम्यान युवा जिल्ह्याध्यक्षाने भाजपला धक्का देत थेट अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. अनिल पाटील यांनी भाजपच्या युवा जिल्ह्याध्यक्षपदाला रामराम करत अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा पक्का निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे मुंबई पार पडलेल्या प्रवेशावेळी त्यांनी आपल्या सहकारऱ्यांसह अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.
यावेळी अनिल पाटील यांनी, अजित पवार यांच्या आदेशाप्रमाणे सर्वांना घेवून नव्या-जुन्यांची सांगड घातली जाईल. पक्षवाढीसाठी योगदान देऊ अशी ग्वाही दिली. तसेच निशिकांत भोसले, राजेंद्रअण्णा देशमुख आणि इतरांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी बळकट करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे.
तसेच अजित पवार यांनी जी संधी दिली आहे, त्याचे सोनं करत प्रामाणिकपणे काम केलं जाईल. जी जबाबदारी मिळेल ती पार पाडण्यासह पक्षनोंदणी आणखी गतीनाम करून पक्षासाठी कार्यक्रम आखू असेही स्पष्टीकरण अनिल पाटील यांनी केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनानंतर सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद फारशी नव्हती. यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा जिल्ह्यावर प्राबल्य राहिलं होतं पण आता चार माजी आमदारांसह जिल्हा परिषदेतील माजी नेते आणि भाजपच्या अनिल पाटील यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यात अजित पवारांची ताकद वाढली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.