
Sangli News : सध्या भाजपला अपक्ष खासदार विशाल पाटील जवळचे वाटतं असून त्यांच्यासाठी ऑफर पे ऑफर सोडली जातेय. पण ज्यांनी कधी काळी भाजपसाठी खासदारकी खेचून आणली त्यांना दरवाजे बंद असल्याचे सांगत आता 'तुम्ही आमचे नाही' राष्ट्रवादीच राहा असे भाजप नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेदरम्यान अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील यांनी भाष्य केलं होतं. या दोन्ही विधानांमुळे आता जिल्ह्यात राजकीय चर्चेला हवा मिळत आहे. तर दोघेही जबाबदार नेते असल्याने त्यांच्या विधानामुळे कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज सुरू झाली आहे. ज्याचे वेगवेगळे अर्थ काढले जातायतं
काही दिवसांपूर्वीच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते माजी खासदार संजयकाका पाटील यांची भेट घेतली होती. चंद्रकांत पाटील यांनी संजयकाका यांच्या चिंचणी येथील निवासस्थान जाऊन भेट घेतली होती. तर याच भेटीनंतर संजयकाका यांचे भाजपमध्ये पुनरागमन होणार, अशी अटकळ बांधण्यात येत होती.
त्यापूर्वी संजयकाका कोल्हापूर येथे भाजपच्या बैठकीला गेले होते. त्यावेळी ही चंद्रकांत पाटील यांनी पॉझिटिव्ह प्रतिक्रिया दिली होती, मात्र अचानक चंद्रकांत पाटील यांना विद्यमान खासदार विशाल पाटील हे जास्त प्रिय वाटू लागले आहेत. त्यांनी एक नाही तर दोन वेळा भाजपची ऑफर स्वत: चंद्रकांत पाटलांनी दिली आहे. फक्त ऑफरची दिली नाही तर ती सतत देत राहू असेही वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
तसेच पालकमंत्र्यांनी, संजयकाका पाटील यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी अजित पवार यांची असल्याचे सांगून चक्क 'यु टर्न' घेतल्याने आता जिल्ह्यात उलट सुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवाय मतदारसंघात नुकत्याच भाजप पदाधिकारी निवडी झाल्या, त्यामध्येही काका गटाला पूर्णपणे डावलण्यात आल्याने भाजप नेतृत्वाच्या हेतूबद्दल प्रश्न चिन्ह उपस्थित केले जातायतं.
पालकमंत्र्यांनी अप्रत्यक्षरीत्या 'संजयकाका आता तुम्ही आमचे नाही' असेच म्हणत त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी अजित पवारांवर झटकली आहे. यामुळे संजयकाकांशिवाय भाजप स्वतःची ताकद अजमवन्याच्या तयारीत दिसत आहे. असे झाल्यास आता राष्ट्रवादीशीही फारकत घेतलेले संजयकाका आता कोणती भूमिका घेणार याकडे कार्यकर्त्यांसह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान आमदार रोहित पाटील यांनीही दोन्ही ठाकरे एकत्र येणार या शक्यतेवर भाष्य करताना, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंद होईल, असे वक्तव्य केलं. पण सध्या तसे काही चालू असल्यास आपल्याला माहिती नसल्याचेही सांगत सावध पवित्रा घेतला आहे. तर वरिष्ठ नेते त्याबाबत निर्णय घेतील अशीही जोड रोहित पाटील यांनी दिल्याने या चर्चेलाही तोंड फुटले आहे.
एकाच जिल्ह्यात दोन महत्वाच्या नेत्यांनी अशा प्रकारे राजकीय भूमिका घेतल्याने राजकीय कार्यकर्त्यांमध्ये याची जोरदाक चर्चा सुरू आहे. तर विरोधकांमध्ये देखील आता कुजबूज सुरू झाली असून या विधांनावरून उलट सुलट अर्थ काढले जातायतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.