Shri Ganesh Sahkari Sakhar Karkhana | Viviek Kolhe Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ganesh Sugar Factory Election : गणेश कारखाना निवडणूक ; करण ससाने म्हणतात, थोरात-कोल्हे युती ब्रँडेड आणि प्रामाणिक

सरकारनामा ब्यूरो

Ahmednagar Politics: : ‘सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे यांच्या नेतृत्त्वाखाली कारखान्याने सुवर्णकाळ अनुभवलेला आहे. साखर कारखान्यावर आणि गणेश परिसरावर त्यांचे विशेष प्रेम होते. कोल्हे साहेबांचा हाच वारसा घेऊनच मी या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. अशी भूमिका कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांनी मांडली.

श्री गणेश सहकारी साखर कारखान्याची (Shri Ganesh Sahkari sakhar Karkhana) निवडणुकीसाठी येत्या 17 जूनला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निमित्त युवा नेते विवेक कोल्हे यांनी गोंडेगाव येथे प्रचार सभा घेतली. यावेळी बोलताना विवेक कोल्हे म्हणाले की, शंकररावजी कोल्हे यांनी अत्यंत संघर्षाच्या काळात गणेश कारखाना चालवला. तब्ब्ल ३८ वर्षे त्यांनी या कारखान्याचे यशस्वी नेतृत्व केलं. त्यामुळे आजही त्यांच्याबद्दल कारखान्यांचे सभासद, शेतकरी आणि कामगारांमध्ये प्रचंड आदराची भावना आहे. कोल्हे साहेबांचा नातू म्हणून त्यांचा हा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी मी या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे.‘

कारखान्याच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनाह साहेबांनी ताकद दिली. त्याच कार्यकर्त्यांनी मला या निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा आग्रह धरला. त्यांचा हा आग्रह मी मोडू शकत नाही. कार्यकर्त्यांनीच मी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यासोबत निवडणूक लढवावी, अशी भूमिका कार्यकर्त्यांनीच मांडली आहे. असही यावेळी विवेक कोल्हे यांनी सांगितलं. तसेच, महाराष्ट्रात सहकारात कधीच राजकारण आले नाही. त्यामुळेच आम्ही बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्त्वाखाली एकत्र आलो. आम्ही गणेश कारखाना सक्षमपणे चालवून दाखवू, संगमनेर आणि संजीवनी आमच्यासाठी महत्त्वाचा तितकाच गणेश कारखानाही आमच्यासाठी महत्त्वाचा असेल, अशी ग्वाहीच विवेक कोल्हेंनी या बैठकीतून उपस्थितांना दिली.

करण ससाने यांनी ही आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, गणेश कारखान्याच्या उज्वल भविष्यासाठी थोरात आणि कोल्हे ही युती ब्रँडेड आणि प्रामाणिक आहे. संयमी, निष्कलंक आणि प्रामाणिक नेतृत्वाने राज्याला आदर्श ठरतील, अशा पद्धतीने बाळासाहेब थोरात यांनी सहकारी संस्था चालवल्या. राजकारणा करतानाही त्यांनी कायम सभासदांच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले. त्याच पद्धतीने विवेक कोल्हे यांनीही लहान वयात आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली गणेश कारखान्याचा भविष्यकाळ उज्वल असेल अशी मला खात्री आहे. (Maharashtra Politics)

प्रवरेच्या नेतृत्वामुळे ऊर्जित अवस्थेत असलेला गणेश कारखान्याला आठ वर्षात उतरती कळा लागली होती. त्यांना कारखाना चालवता आला नाही म्हणून पाणी असूनही शेतकऱ्यांनी ऊस लावणे बंद केले.गणेश कारखाना बंद करण्यासाठी सगळ्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या.शेतकऱ्यांना वेळेत ऊसतोड मिळाली नाही. त्यांच्या मालाला भावही कमी दिला गेला. वेळेत शेतकऱ्यांचे देणे दिले नाही. संगमनेर किंवा संजीवनी कारखान्याने ऊस नेला नसता तर या भागातील शेतकऱ्यांना ऊस पेटवून द्यावा लागला असता. पण आता थोरात आणि कोल्हे हे दोघेही संस्था चांगल्या चालविण्यासाठी राज्यात मोठं नाव आहे. तसेच कारखान्याचे सभासद, कामगार, शेतकरी गेदेखील त्यांच्यापाठीशी खंबीरपणे उभे राहतील. असा विश्वास आहे, अशी भूमिका सचिन गुजर यांनी मांडली.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT