Gautam Navlakha Case Update : एल्गार परिषद प्रकरण; नवलाखांच्या याचिकेवर न्यायालयाचे NIA ला निर्देश, म्हणाले..

Elgar Parishad Case Update : आता सुनावणी २८ जून रोजी, जामीन मिळणार का?
Gautam Navlakha Case Update : Elgar Parishad Case Update :
Gautam Navlakha Case Update : Elgar Parishad Case Update :Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : एल्गार परिषदेतील सक्रिय कार्यकर्ते व कथित माओवाद्यांशी संबंध असलेल्या प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाने आज (सोमवार दि. १२ जून) राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून उत्तर मागितले आहे. न्यायाधीश ए एस गडकरी आणि एस जी डिगे यांच्या खंडपीठाने नवलखा यांच्या याचिकेवर २८ जून रोजी सुनावणी होणार असल्याचे सांगितले. (Mumbai high Court's direction to NIA on Gautam Navlak's plea)

सीपीआयचा सक्रिय सदस्य असल्याचा दावा :

विशेष एनआयए कोर्टाने नवलाखांच्या जामीन अर्जावर दोनदा सुनावणी केल्यामुळे खंडपीठाने नवलाखा यांच्या वकिलांना खटल्याशी संबंधित सर्व तारखा अचूकपणे रेकॉर्डवर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

Gautam Navlakha Case Update : Elgar Parishad Case Update :
Koregaon Bhima : धमकीनंतर चंद्रकांतदादांनी घरुनच केलं विजयस्तंभाला अभिवादन ! ; म्हणाले, 'छातीवर गोळ्याही..'

विशेष न्यायालयाचा निर्णय चुकीचा - नवलाखांचा दावा :

उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात नवलखा म्हणाले की, 'विशेष न्यायालयाकडून मला जामीन नाकारण्याचा निर्णय योग्य नव्हता.' ऑगस्ट 2018 मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर नवलाखांना नजरकैदेत ठेवण्याच्या मागणीला सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये परवानगी दिली होती. सध्या नवलखा नवी मुंबई येथे वास्तव्यास आहे.

उच्च न्यायालयाची भूमिका :

नवलखा यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी अपील करण्याची ही दुसरी वेळ आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये विशेष एनआयए न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नवालाखा यांनी यापूर्वीच उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर एनआयएने नवलखांच्या जामीन अर्जाला विरोध करत दावा केला की, 'नवलाखांची ओळख पाकिस्तान इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (ISI) च्या एका व्यक्तिशी झाली होती, ज्यामुळे त्यांचा या संघटनेशी संबंध असल्याचे दिसून येते.'

Gautam Navlakha Case Update : Elgar Parishad Case Update :
Bhima Koregaon : "सरकारच पेशवाईचं असेल, तर मंत्री भीमा कोरेगावच्या स्तंभाला अभिवादन का करतील?"

उच्च न्यायालयाने विशेष न्यायालयाला आदेश :

उच्च न्यायालयाने म्हंटले होते की, जामीन अर्जावर विशेष न्यायालयाने नव्याने सुनावणी घेण्याची आवश्यकता आहे. असे निर्देश देत हे प्रकरण पुन्हा न्यायालयात पाठवले होते. चार आठवड्यांत खटला पूर्ण करण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाकडून विशेष न्यायालयाला दिले गेले होते. नवलखा यांनी नियमित जामिनासाठी विशेष न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर विशेष न्यायालयाने याच याचिकांवर सुनावणी करत, जामीन अर्ज फेटाळून लावला.

Gautam Navlakha Case Update : Elgar Parishad Case Update :
Supreme Court Big Relief To Thackeray : सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; शिवसेना भवन, शाखांचा ताबा ठाकरेंकडेच!

2017 मध्ये गुन्हा दाखल :

गौतम नवलखा विरुद्धचा खटला हा, 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेच्या परिषदेत केलेल्या कथित प्रक्षोभक भाषणांशी संबंधित आहे. ज्यात दुसऱ्या दिवशी कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभ जवळच्या परिसरात हिंसाचार भडकल्याचा पोलिसांचा दावा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com