Ajit Kale, Rashakrushn Vikhe Patil, Balasaheb Thorat, Shehlata Kolhe
Ajit Kale, Rashakrushn Vikhe Patil, Balasaheb Thorat, Shehlata Kolhe Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ganesh Sugar Factory : नगरमधील कारखाने शेकडो कोटींनी तोट्यात कसे? काळेंचा विखे, थोरात, कोल्हेंना थेट सवाल

सरकारनामा ब्यूरो

Ganesh Factory Election : सहकारात गेल्या कित्येक दशकांपासून काही लोकांनी सहकाराच्या नावाखाली शेतकऱ्यांचे, कामगारांचे व सामान्य जनतेचे शोषण केले. शोषण करूनही गणेश कारखान्यासह जिल्ह्यातील इतर कारखाने सतत शेकडो कोटी रुपयांनी तोट्यात आहे. ते कसे काय, असा थेट सवाल शेतकरी संघटनेचे अॅड. अजित काळे यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांना केला आहे.

गणेश साखर कारखान्याची निवडणूक दिवसेंदिवस चुरशीची होत चालली आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि भाजपच्या स्नेहलता कोल्हे एकत्र आल्या आहेत. यांच्या गटाने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrushna Vishe Patil) यांना आव्हान दिले आहे. शेतकरी संघटनेनेही आपले नऊ उमेदवार उतरवल्याने कारखान्याच्या निवडणुकीत रंगत वाढली आहे. शेतकरी संघटनेचे अॅड. काळे यांनी विखे, थोरात-कोल्हे यांच्यावर निशाणा साधला.

काळे म्हणाले, "जिल्ह्यातील सर्व कारखाने आज तोट्यात आहे. त्या कारखान्यांवर शेकडो कोटी रुपयांचे कर्ज आहे. ते कर्ज कसे झाले, याचे उत्तर जिल्ह्यातील प्रस्थापितांनी द्यावे. शेतकरी संघटनेने जिल्ह्यातील शेतकरी आणि कामगारांच्या न्यायासाठी वेळोवेळी लढा दिला आहे. अनेक सहकारी संस्थेत कायदेशीर मार्गाने न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न केले आहेत. त्यासाठी कामगार आणि शेतकऱ्यांकडून एक रुपयाही घेतला नाही." (Latest marathi News)

दरम्यान, चिन्ह वाटप केल्यानंतर विखेंच्या गटाने प्रचाराचा शुभारंभ केला आहे. तर गुरुवारी (ता. ८) सायंकाळी वाकडी येथील खंडोबा मंदिरात शेतकरी संघटनेच्या प्रचाराचा श्री गणेशा करण्यात येणार आहे. अॅड. अजित काळे यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ वाढवला जाणार आहे. यासाठी गणेश कारखान्याचे सभासद ऊस उत्पादक कामगार उपस्थित राहणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी माहिती दिली.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT