Police Accepting Bribe Online: हप्ता म्हणून २५ हजार ऑनलाईन घेणारा पोलिस कर्मचारी निलंबित..

Police suspended Who Accepted 25 Thousand Bribe: कारवाईची भिती दाखवत त्याने अनेकांकडून हजारो रुपये उकळल्याची माहिती देखील आहे.
Police accepting bribe online News
Police accepting bribe online NewsSarkarnama
Published on
Updated on

Paithan News: अवैध गुटखा विक्री करणाऱ्याकडून हप्ता म्हणून २५ हजारांची लाच ऑनलाईन स्वीकारणाऱ्या पैठण उपविभागीय पोलिस कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. (Police accepting bribe online News) ग्रामीणचे पोलिस अधिक्षक मनिष कलावनिया यांनी तातडीने सदर पोलिस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करत दणका दिला. या प्रकाराने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

Police accepting bribe online News
Sanjay Raut slams Devendra Fadnavis : फडणवीस, तुम्ही विरोधकांच्या हत्येचंही टेंडर काढलं ? ; राऊत संतापले ; 'औरंगजेब' चे सरकार चालू..

हा लाचखोर पोलीस कर्मचारी अनेकांना धमक्या देऊन पैशाची वसुली करत असल्याच्या अनेक तक्रारी होत्या. (Paithan) पोलिस अधिक्षकांकडे जेव्हा तक्रार आली तेव्हा त्यांनी एका अधिकाऱ्याला या कर्मचाऱ्यावर पाळत ठेवून चौकशी करण्याचे आदेश दिले होते. (bribe News)

पैठण येथील डीवायएसपी पथकात कार्यरत सचिन भूमे याने एका अवैध गुटखा विक्रत्येला हप्ता म्हणून पैसे मागितले होते. (Aurangabad) तडजोडीनंतर २५ हजार रुपये ऑनलाईन पाठवण्यास सांगितले, पैसे मिळाल्याचे समजताच भुमेवर लक्ष ठेवून असलेल्या पथकाच्या जाळ्यात तो अडकला.

भूमे हा तालुक्यातील सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यावाल्यांच्या संपर्कात असायचा. डीवायएसपी पथकात असल्याचा धाक आणि कारवाईची भिती दाखवत त्याने अनेकांकडून हजारो रुपये उकळल्याची माहिती देखील आहे.

पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गुटखा माफियाला कारवाईची धमकी देत त्याच्याकडे भुमेने पैशांची मागणी केली होती. ऑनलाईन २५ हजार भुमे याने हप्ता म्हणून स्वीकारल्याची खबर लागताच पोलीस अधीक्षकांनी त्याला तात्काळ निलंबित केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com