Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Politics : मिरजमध्ये गणपती विसर्जनावेळी दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले, पन्नास खोके...एकदम ओके' घोषणांनी वातावरणही तापलं

Shivsena UBT Vs Shivsena : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात चाळीस आमदारांनी बंड पुकारले. त्यानंतर राज्यभर 'पन्नास खोके...एकदम ओकेच्या...' घोषणा देण्यात आल्या. त्या आजही दिल्या जात आहेत.

Aslam Shanedivan

Summary :

  1. मिरजमध्ये गणपती विसर्जनावेळी उद्धव सेना आणि शिंदे सेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले.

  2. 'पन्नास खोके...एकदम ओके' अशा घोषणांनी वातावरण अधिक तापलं.

  3. दोन्ही गटांच्या घोषणाबाजीमुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं.

  4. गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत राजकारणाची छाया दिसून आली.

  5. यामुळे मिरजमध्ये राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालं आहे.

Miraj News : राज्यात सत्तांतर होण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील बंड होते. शिवसेनेतील चाळीस आमदारांनी बंड पुकारल्याने महाविकास आघाडीचे सरकार पडले. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पाय उतार व्हावे लागले. यानंतर राज्यात महायुतीचे सरकार आले आणि 'पन्नास खोके...एकदम ओकेच्या...' घोषणाही देण्यात आल्या. या घोषणा आजही दिल्या जात आहेत. यावरून राजकीय वातावरण तंग होत आहे. असाच प्रकार मिरजमध्ये गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत घडला असून दोन्ही शिवसेना आमने-सामने आल्या. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिलेल्या 'पन्नास खोके...एकदम ओकेच्या...' घोषणांमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले.

गणपती विसर्जनाची मिरवणुकीत अनेक ठिकाणी वादावादीचे प्रकार घडले असून सांगलीच्या मिरजमध्ये देखील असाच प्रकार समोर आला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केला नसता तर अनुचित घटना घडली असती. येथील मार्केटमधील महाराणा प्रताप चौकात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्वागत कक्षा समोरच हा वादावादीचा प्रकार घडला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, गणपती विसर्जनासाठी येथील मार्केटमधील महाराणा प्रताप चौकात राजकीय पक्षांनी स्वागत कक्षाची उभारणी केली होती. येथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनेही स्वागत कक्षाची उभारणी करण्यात आली होती. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वैद्यकीय कक्षाचा पदाधिकारी आणि कार्यकर्त्याचा गणपतीची मिरवणूक ठाकरेंच्या स्वागत कक्षासमोर आली. यावेळी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांने शद्दू मारून आनंद दिघे यांच्या चित्रपटातील गाण्यावर ठेका धरला.

हिच गोष्ट शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना खटकली. ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनीही माईकवरून पन्नास खोके... एकदम ओकेच्या... जोरदार घोषणा दिल्या. ज्यानंतर दोन्ही गटात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे वाद निवळला. मात्र मिरवणुकीत काही काळ तणाव कायम होता. सत्तांतराच्या साडेतीन वर्षानंतर ही ठाकरे आणि शिंदे सेनेतील संघर्ष यानिमित्त पाहायला मिळाला. या संघर्षामुळे बंदोबस्तात असलेल्या पोलिसांची मात्र तारांबळ उडाली होती.

एकीकडे दोन्ही गटाचा संघर्ष उफाळण्याची शक्यता असतानाच दुसरीकडे दोन्ही गटांमध्ये गटाबाजी पाहण्यास मिळाली. शिवसेनेच्या दोन्ही गटात स्वागत कक्षावरून दोन गट पडल्याचे समोर आले. शिवसेना ठाकरेंच्या स्वागत कक्षावर जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष आणि मिरजेतील प्रमुख पदाधिकारी गायब होते. तर मिरजेतील मोजकेच पदाधिकारी दिसले.

यावेळी एकनाथ शिंदे यांच्याही शिवसेनेच्या दोन स्वागत कक्ष दिसून आल्याने शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर आली. शिंदेंच्या स्वागत कक्षावर शहरातील मोजकेच पदाधिकारी होते. तर नव्याने पक्षात दाखल झालेले मोहन वनखंडे मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कमानीवर दिसले. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

FAQs in Marathi

प्र.१: मिरजमध्ये काय घडलं?
उ. गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान उद्धव आणि शिंदे गटातील शिवसैनिक आमनेसामने आले.

प्र.२: घोषणांमुळे तणाव का निर्माण झाला?
उ. उद्धव गटाच्या कार्यकर्त्यांनी 'पन्नास खोके...एकदम ओके' अशा घोषणा दिल्या.

प्र.३: कोणते गट आमने-सामने आले?
उ. शिवसेनेचे उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट आमनेसामने आले.

प्र.४: या घटनेचा परिणाम काय झाला?
उ. मिरजमध्ये वातावरण तणावपूर्ण बनलं आणि राजकारण पेटलं.

प्र.५: हे प्रकरण कोणत्या सणात घडलं?
उ. हे प्रकरण गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान घडलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT