MP Udayanraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

माझ्या ताब्यात 'ईडी' द्या, दाखवतो सगळ्यांना... खासदार उदयनराजे

खासदार उदयनराजे Udayanraje Bhosale म्हणाले, सध्याची परिस्थिती कोणी बिघडवली याचा विचार केला पाहिजे. सध्या मी माझे आवडते My favorite चॅनेल 'टॉम ॲण्ड जेरी' हे Tom and Jerry सुध्दा बघायचे मी बंद केलंय.

सरकारनामा ब्युरो

सातारा : ''या लोकांनी पैसे खाल्लेच आहेत. माझ्या हातात 'ईडी' द्या, मी दाखवतो या सगळ्यांना. सारखे सारखे 'ईडी' म्हणजे चेष्टा झालीय. पानपट्टीवरील बिडी मिळते ना तशी 'ईडी'ची अवस्था झालीय. या सर्वांना ताब्यात घ्या आणि चाप लावा सगळे सरळ होतील. दांडक्याने सडकून काढली पाहिजेत,'' अशी सडेतोड टीका साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.

उदयनराजेंनी आज कास परिसरातील कामाची पहाणी केली, त्यानंतर काही पत्रकारांनी त्यांच्याशी सध्याच्या परिस्थितीकडे कसे पाहता असे विचारले त्यावर त्यांनी सडेतोड उत्तरे देत महाविकास आघाडीसह इतर नेत्यांवर जहरी टीका केली.

उदयनराजे म्हणाले, ''सध्याची परिस्थिती कोणी बिघडवली याचा विचार केला पाहिजे. सगळ्यांना सांगतो की माझे आवडते चॅनेल 'टॉम ॲण्ड जेरी' हे सुध्दा बघायचे मी बंद केलंय. आता सध्या सुरू असलेल्या राजकारण्यांच्या माकड उद्या बघत बसतो. खूप मजा येते. कोण कोणाला आत टाकते, कोण कोणाला मारते. कोण म्हणंतय हा मुख्यमंत्री आहे का, तो आणखी काही तरी म्हणतो. काय बोलणार यावर,'' असा प्रश्न त्यांनी केला.

कोल्हापूरच्या राष्ट्रवादीच्या सभेबाबत बोलताना ते म्हणाले, ''कोल्हापूरला उत्कृष्ठ सभा झाली. भरपूर लोक आले होते. एवढी लोक आली त्यावेळी तुमची डिलेव्हरी काय होती.'' काही लोकांनी पैसे खाल्लेच आहेत. त्यामुळे माझ्या हातात 'ईडी' द्या. मग मी दाखवतो या सगळ्यांना. सध्या सारखे सारखे 'ईडी' म्हणजे चेष्टा झालीय.

पानटपरीवर 'बिडी' मिळतेय ना तशी 'ईडी'ची अवस्था झालीय. त्यांना ताब्यात घ्या. चाप लावा सगळे सरळ होतील. दांडक्याने सडकून काढली पाहिजेत. एका बाजूला लोक कसे जगत आहेत. या लोकांना दिसत नाही. हे मात्र, एकमेकांची पाठ थोपटून जगत आहेत. दोन वर्षे ते जेलमध्ये होते, त्यांनी काय केले नाही. जे आता जेलमध्ये आहेत, त्यांनीही काय केलेले नाही. लोकांना काय डोळे, मेंदू नाहीत, असे वाटते काय, असे सांगून उदयनराजे म्हणाले, लोक हसतात. आता निवडणुका लागल्या तर ही मंडळी कशी उभी राहणार हे त्यांचे त्यांनाच माहिती आहे. पण माझे नाव कोणी घेतले तर मी कोणाच्या नादी लागत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT