सातारा-जावळीत 'राष्ट्रवादी'चाच आमदार झाला पाहिजे....जयंत पाटील

पालकमंत्री Balasaheb Patil पाटील, खासदार MP Srinivas Patil पाटील यांनीही पक्षसंघटना वाढीसाठी प्रयत्न करावेत व घराघरांत राष्ट्रवादीचे NCP विचार पोचवून पवार साहेबांचे हात बळकट करावेत, असे आवाहन जयंत पाटील Jayant Patil यांनी केले
Jayant Patiil, Shashikant Shinde
Jayant Patiil, Shashikant ShindeSandip Gadve, Reporter
Published on
Updated on

केळघर : राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष तळागाळातील सामान्य व्यक्तीच्या प्रगतीसाठी नेहमीच काम करतो. येणाऱ्या विधानसभेत सातारा-जावळीत राष्ट्रवादीचा आमदार निवडून येण्यासाठी पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आतापासूनच कामाला लागले पाहिजे. आपला पक्ष कोणाच्याही दावणीला बांधण्याची गरज नाही. प्रत्येक गावागावात राष्ट्रवादीची शाखा व घराघरात कार्यकर्ता निर्माण झाला पाहिजे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसून कामाला लागले पाहिजे. निष्ठेने काम केले तर त्याचे फळ निश्चितच मिळते, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले.

मेढा (ता. जावळी) येथील एस. एस. पार्टे मंगल कार्यालयात राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमाचे आयोजन मंत्री पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, प्रदेश युवक अध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वरपे, प्रदेशाध्यक्ष युवती सलक्षणा सलगर, प्रदेशाध्यक्ष युवक विद्यार्थी सुनील गव्हाणे, आयटी सेलचे प्रांतिक अध्यक्ष सारंग पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, राष्ट्रवादीच्या जिल्हा महिला अध्यक्षा समिंद्रा जाधव, युवा जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे , जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार आदी उपस्थित होते.

Jayant Patiil, Shashikant Shinde
कोल्हापूर पोटनिवडणुकीतील विजय धर्मांध राजकारणाला चपराक... शशीकांत शिंदे

जयंत पाटील म्हणाले, ''राज्यात सरकार आपले आहे. त्यामुळे काही काम असले तर निसंकोचपणे मला थेट भेटा.'' पालकमंत्री पाटील, खासदार पाटील यांनीही पक्षसंघटना वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत व घराघरांत राष्ट्रवादीचे विचार पोचवून पवार साहेबांचे हात बळकट करावेत, असे आवाहन केले.

Jayant Patiil, Shashikant Shinde
Video: राज ठाकरे कोणच्या हाताचे बाहुले झालेत हे सर्वांना माहिती आहे: जयंत पाटील

आमदार शशीकांत शिंदे म्हणाले,‘‘ ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुका तेवढ्याच ताकतीने लढवल्या जातील. जिल्ह्यात पुन्हा राष्ट्रवादी नंबर एकचा पक्ष बनवण्यासाठी सर्वजण प्रयत्न करू.’’ दीपक पवार यांचेही भाषण झाले. सुधीर पवार यांनी स्वागत केले. सुरेश पार्टे यांनी सूत्रसंचालन केले. रूपाली भिसे यांनी आभार मानले. यावेळी प्रदेश सरचिटणीस गोरख नलावडे, युवती जिल्हाध्यक्ष पूजा काळे, सभापती जयश्री गिरी, राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष रूपाली भिसे, माजी सभापती बापूराव पार्टे, मोहनराव शिंदे, सुहास गिरी यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com