मुंबई - राज्यात शिंदे गट व भाजपने मिळून सत्ता मिळविली आहे. मात्र अजूनही मंत्रीमंडळ विस्तार झालेला नाही. काही दिवसांपूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले ( Shivajirao Kardile ) यांनी एक भाकीत वर्तविले होते. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यात तीन मंत्रीपदे मिळावी, अशी मागणी कर्डिले यांनी मुंबईत झालेल्या अहमदनगर भाजपच्या बैठकीत उपमुख्यमंत्री तथा भाजपचे अहमदनगर जिल्हा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. ( Give three ministerial posts to Nagar district: Kardile demands Fadnavis )
देवेंद्र फडणवीस हे अहमदनगर जिल्ह्याचे भाजप प्रभारी आहेत. महाविकास आघाडीने अहमदनगर जिल्ह्याला दोन कॅबिनेट व एक राज्यमंत्रीपद दिले होते. त्याच धर्तीवर शिंदे गट व भाजपच्या सरकारनेही अहमदनगर जिल्ह्याला दोन कॅबिनेट व एक राज्यमंत्रीपद द्यावे, अशी मागणी करण्यात येत होती. कर्डिलेंनीही याबाबत भाकीत व्यक्त केले होते.
मुंबई येथील सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांनी भाजप संघटात्मक बैठक आयोजीत केली होती. या बैठकीत कर्डिले यांनी ही मागणी केली. या बैठकीला भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा कोअर कमीटी सदस्य आमदार प्रा.राम शिंदे, भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, भाजप उत्तर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, आमदार मोनिका राजळे, शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, भाजप युवा नेते विवेक कोल्हे, भाजप जिल्हा परिषद गटनेते जालिंदर वाकचौरे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यांच्यासाठी मंत्रीपदाची मागणी
अहमदनगर जिल्ह्यात सध्या भाजपचे चार आमदार आहेत. यात विधानसभेचे सदस्य असलेले राधाकृष्ण विखे पाटील, मोनिका राजळे व बबनराव पाचपुते तसेच विधानपरिषदेचे सदस्य असलेले राम शिंदे यांचा समावेश आहे. यातील विखे व शिंदे यांना कॅबिनेट तर मोनिका राजळे यांना राज्यमंत्रीपद मिळावे अशी मागणी करण्यात आली असल्याचे सूत्रांकडून समजते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.