Gokul News : गेल्या काही दिवसापासून गोकुळ दूध संघातील राजकारण उफाळून आले आहे. सत्ताधारी गटाला विरोधी गटाकडून घेरण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र सध्याची राजकीय गणित पाहता आमदार सतेज पाटील वगळता महायुती म्हणून सर्व एकत्र आल्याने एकमेकांच्या विरोधात कुरघोड्या सुरु आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप- प्रत्यारोपांचा खेळ सुरु आहे. सत्ताधाऱ्यांनी वाढवलेल्या 1308 दूध संस्था त्याला कारणीभूत आहे. त्याला न्यायालयात आव्हान दिल्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच करून 80 दिवसात चौकशी करून निवडणूक घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याची चौकशी सुरु झाली असून त्यातील काही संस्था रद्द ठरण्याची शक्यता आहे.
गोकुळमधील सुमारे 350 अधिक दूध संस्था 'डेंचर झोन'मध्ये आहेत. नियमांचे गणित मांडले असता या संस्था अपात्र ठरण्याच्या मार्गावर आहेत. गोकुळ संघाकडून साहाय्यक निबंधक (दुग्ध) यांच्याकडे दिलेल्या यादीनुसार 5470 संस्थांची यादी दिली आहे. मात्र, सर्व निकष पाहता यातील सुमारे 350 अधिक संस्था अपात्र ठरणार असल्याचे स्पष्ट होते. एक जूनला याचा निश्चित आकडा अधिकृत जाहीर होणार आहे.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीपेक्षा अवसायनातील किती संस्था अपात्र ठरणार याबाबतची उत्सुकता अधिक आहे. वेगवेगळ्या चौकशींच्या फेऱ्यात अडकलेल्या गोकुळमध्ये प्रत्येक संस्था वाचविण्यासाठी सत्ताधारी तर अनेक संस्था अपात्र ठरविण्यासाठी एक यंत्रणा सक्रिय झाली आहे. मात्र, संस्था पात्र-अपात्र ठरविण्यासाठी नेमका कोणता नियम वापरता येईल, यासाठी शासकीय पातळीवर कस लागला आहे.
दरम्यान, बुधवारी सहाय्यक दुग्ध निबंधक कृष्णा ठाकरे यांनी चौकशी सुरु असलेल्या 1320 दूध संस्थांची दूध संकलन किती आहे. याची माहिती मागवणारे पत्र गोकुळ दूध संघाकडे मागितले आहे. हे पत्र प्राप्त झाल्यानंतर गोकुळ दूध संघाच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
कट ऑफ डेट नुसार २००३ पर्यंत गोकुळच्या यादीत 5470 इतक्या दूध संस्था मतदानाला पात्र आहेत. यानंतर अवसायनात निघालेल्यानंतर फेरजिवंत न केलेल्या संस्था सुमारे 50 इतक्या आहे. यातील शून्य दूध असलेल्या संस्थांची संख्या सुमारे 212 इतकी आहे. कमी दूध असलेल्या संस्थांची संख्या सुमारे 100 आहे. द्विसदस्यी समितीकडे चौकशीसाठी असलेल्या संस्था 427 इतक्या आहे. 2021 नंतरच्या नोंदणीकृत संस्थांची चौकशी सुरू असलेल्या संस्था 1872 इतक्या असून त्यातील सुनावणीला गैरहजर राहिलेल्या संस्थांची संख्या 100 हून अधिक आहे.
पत्रच पोहोचले नाही, संस्थाच अस्तित्वात नाही अशी संख्या सुमारे 100 आहेत. न्यायालयात मुद्दा असलेल्या अवसायनातील चौकशी सुरू असलेल्या संस्था 1320 आहेत.
सध्या या 1320 दूध संस्थांची चौकशी सुरु आहे. या संस्था अडचणीत असून त्यातील सुनावणीला गैरहजर असलेल्या संस्था 100 इतक्या आहेत. गोकुळ'च्या यादीनंतर अवसायनातून फेरजिवंत न झालेल्या संस्था 50 आहेत. दूध कमी व इतर कारण असलेल्या संस्था 100 तर अस्तित्वात नसलेल्या संस्था 100 आहेत. त्यामुळे येत्या 1 जून रोजी यातील आणखी काही संस्थाची विकेट पडणार हे नक्की.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.