Gokul Controversy Hasan Mushrif sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul : हसन मुश्रीफांनी 'तो' मुद्दा तापवला, 'गोकुळ'चे प्रशासक अ‍ॅक्शन मोडवर, गेल्या वर्षीची आकडेवारीच दिली अन् म्हटले नैसर्गिक...

Gokul Hasan Mushrif : प्रशासकांनी गोकुळचा चार्ज घेतल्यापासून 50 ते 60 हजार लिटरने गोकुळचे दूध कमी झाले आहे, असा दावा मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला होता. या दाव्याला 'गोकूळ'कडून उत्तर देण्यात आले आहे.

Rahul Gadkar

Gokul News : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळ दूध संघावर प्रशासक आल्यानंतर दुधाचे प्रमाण घटले, आहे असं वक्तव्य केल्यानंतर 'गोकुळ'कडून त्याला स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांचा मुद्दा खोडून काढत दूध घटनेचे कारण हे नैसर्गिक असल्याचे गोकुळ दूध संघाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

वाढलेल्या उन्हाळ्यामुळे जनावरांना त्रास होत असून त्याचा परिणाम दूध उत्पादनावर होत आहे. गेल्या पंधरा दिवसांच्या कालावधीत दूध संकलनामध्ये चढ-उतार दिसून येत असले तरी, मागील वर्षाच्या याच कालावधीशी तुलना करता सुमारे ४६ हजार लिटरची वाढ नोंदविण्यात आली आहे. उन्हाळ्यात दूध संकलनात होणारे कमी-जास्त प्रमाण हे नैसर्गिक स्वरूपाचे असल्याचे संघाकडून स्पष्ट करत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळला सध्या दुधाची चणचण आहे. हा मुद्दा खोडून काढला.

नेमके काय म्हणाले मुश्रीफ?

प्रशासकांनी गोकुळचा चार्ज घेतल्यापासून 50 ते 60 हजार लिटरने गोकुळचे दूध कमी झाले आहे. उष्णता हे कारण जरी असलं तरी संकलन कमी होणं ही धोक्याची घंटा आहे. प्रशासक मंडळाला काम करू दिलं पाहिजे. गोकुळच्या प्रशासक मंडळाने राजकारण न करता गोकुळचे कामकाज चांगले करावे. गोकुळचे नाव गोकुळच्या ब्रँडची बदनामी होईल असं प्रशासकांनी काम करू नये.सर्व उत्पादकांनी आपलं दूध गोकुळकडे घाला. गोकुळला दुधाची गरज आहे. गोकुळला दुधाची चणचण आहे.

गाईचे दूध दोन रुपयांनी महागणार

वाढते इंधन दर, कच्च्या मालाच्या किंमती तसेच वाहतूक, पॅकेजिंग व इतर अनुषंगिक खर्चामध्ये सातत्याने होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर गोकुळ दूध संघाने गाय दुधाच्या विक्री दरामध्ये प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.तर, म्हैस दूध दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय गोकुळ दूध संघाच्या प्राधिकृत अधिकारी मंडळाच्या मार्गदर्शनाखाली गोकुळ शिरगाव येथील प्रधान कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला असून, सदर दरवाढ दिनांक २१ मे २०२६ पासून लागू करण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT