Gokul Milk Rate : CNG, पेट्रोल, डिझेलनंतर आणखी एका दरवाढीचा शॉक : कोल्हापूरमध्ये होणार 'गोकुळ'च्या नवीन दराचा निर्णय

Gokul milk price hike decision in Kolhapur: देशात पेट्रोल व डिझेलचे दर वाढल्याने महागाईचा भडका उडणार आहे. इंधन दरवाढीमुळे गोकुळ दूधसंघ दूध दरवाढ करण्याच्या तयारीत आहे. शनिवारी प्रशासक बोर्ड मिटिंगमध्ये निर्णयाची शक्यता आहे.
Gokul Milk Union is likely to increase buffalo and cow milk prices
Gokul Milk Union is likely to increase buffalo and cow milk pricesSarkarnama
Published on
Updated on

Gokul Milk Rate: इराण-अमेरिकेतील भडकलेल्या युद्धाचे गंभीर परिणाम भारतात दिसू लागले आहेत. बुधवारी (15 मे) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 3 रुपयांची दरवाढ लागू झाली आहे. याचा परिणाम आता पुरवठा साखळीवर होणार असून सर्वच क्षेत्रात महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे.

अशातच बुधवारी अमूल दूध संघाने म्हैस आणि गायीच्या दुधामध्ये प्रतिलिटर २ रुपयांची दरवाढ जाहीर केली आहे. त्याचबरोबर मदर डेअरीने देखील दूध दरवाढ केली आहे. वाढत्या इंधन दरामुळे आता गोकुळ दूध संघ देखील दूध दरवाढ करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. म्हैस आणि गाय दुधाच्या विक्रीमध्ये दरवाढ करण्यात येणार असून शनिवारी होणाऱ्या प्रशासक बोर्ड मिटिंगमध्ये याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची शनिवारी (दि.16), प्रशासक मंडळाची बैठक होणार आहे. 4 मी रोजी संचालक मंडळाची मुदत संपल्याने नियुक्त झालेल्या 5 सदस्यीय मंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत गोकुळ दूधाच्या खरेदी, विक्री दरवाढी संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.

Gokul Milk Union is likely to increase buffalo and cow milk prices
Gokul Scam : गोकुळमध्ये माजी संचालकांचा महाकांड? अधिकारी बनण्यासाठी 30 लाख, तर कर्मचारी होण्यासाठी 20 लाखांचा 'जुगाड'

पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे दूध पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. वाहतुकीच्या खर्च वाढणार आहे. शिवाय दुधावर प्रक्रिया करून ते ग्राहकापर्यंत पोहचवण्याचा अधिक खर्च आहे. त्यामुळे देशातील दोन मोठ्या दूध संस्थांनी अमूल व मदर डेअरीकडून दूध विक्री दरामध्ये वाढ केली आहे. आता गोकुळ दूध संघ देखील दरवाढ करण्याच्या तयारीत आहे.

Gokul Milk Union is likely to increase buffalo and cow milk prices
Kolhapur ZP News: केंद्राकडून पैसे येताच कोल्हापूरमध्ये नवा वादाला फुटलं तोंड; आमदारांची कामे ZP निधीतून का करावीत?

... तर महिनाभरात दुसऱ्यांदा वाढ

गोकुळमधील संचालकांची मुदत संपण्यापूर्वी संचालक मंडळाने म्हैस व गाय दुधाच्या प्रतिलिटर खरेदी व विक्री दुधामध्ये २ रुपयांची वाढ केली होती. त्यामुळे प्रतिलिटर म्हैस दूध ७० रुपयांना ग्राहकांना मिळत होते. शनिवारी पुन्हा दरवाढीच्या निर्णय झाल्यास प्रतिलिटर ७२ रुपये दर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इंधन दरवाढीसोबत दूध दरवाढीचा बोजा ग्राहकांवर पडणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com