Gokul Politics : 'गोकुळ' अध्यक्षपदासाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीमध्ये शासन नियुक्त चार सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. त्यामुळे महायुतीचे पारडे जड आहे. महायुतीमध्ये भाजपकडे अध्यक्षपद असेल, अशी चर्चा होती. मात्र, महायुतीकडून धक्कातंत्राचा अवलंब करत राष्ट्रवादी काँग्रेसला अध्यक्षपद दिले आहे.
समविचारी आघाडीच्या शशिकांत पाटील चुयेकर यांच्या विरोधात महायुतीकडून रणजीतसिंह पाटील हे लढणार आहेत. रणजीतसिंह पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार के पी पाटील यांचे सुपुत्र आहेत. या विषयीचे वृत्त एका मराठी वृत्तपत्राने दिले आहे.
गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्य नेतृत्वाखालील समविचार आघाडीला 13 जागा मिळाल्या आहेत. तर, महायुतीकडे 12 जागा आहेत. मात्र, सभेसाठी 14 सभासद उपस्थित असणे आवश्यक असल्याने कोरमचा मुद्दा उपस्थित करत सरकारने चार शासन नियुक्त सदस्यांची नियु्क्ती करत त्यांना मतदानाचा अधिकार दिला आहे.
सरकारच्या या निर्णयाविरोधात समविचार आघाडी हायकोर्टात गेली होती. मात्र, सोमवारी झालेल्या सुनावणी सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्यात औरंगाबाद खंडपीठाने नकार दिला. तसेच शासन नियुक्त चार सदस्यांचे मतदान वेगळ्या मतपेटीमध्ये ठेवण्यास सांगितले. खंडपीठाची पुढील सुनावणी 25 नोव्हेंबरला होणार आहे.
सरकारकडून शासन नियुक्त सदस्य म्हणून शिवाजी दिनकर आडनाईक, डॉ. प्रवीणचंद्र हेंद्रे, कृष्णात पाटील आणि अॅड. प्रशांत पाटोळे यांची नियुक्ती केली आहे. हे चारही सदस्य मतदान करणार आहेत. दरम्यान, या सदस्यांचे मतदान हे वेगळ्या पेटीत ठेवले जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.