Gokul Milk : 'गोकुळ'च्या अध्यक्षपदाबाबत हसन मुश्रीफ यांची मोठी घोषणा; म्हणाले 'उद्या महायुतीचा उमेदवार ठरणार'

Gokul Milk News : महायुतीच्या नेत्याची बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन मंत्री हसन मुश्रीफ यांनी 'गोकुळ'च्या अध्यक्षपदाबाबत मोठी घोषणा केली.
Hasan Mushrif
Hasan MushrifSarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur News : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक 10 नोव्हेंबरला होत आहे. त्यामुळे सोमवारी वेगवान घडामोडी घडल्या. समविचारी आघाडीने कोल्हापुरात मोठा मोर्चा काढला तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर हायकोर्टाने शासन नियुक्त चार संचालकांचा मताचा अधिकार कायम ठेवला असता तरी ते संचालकच्या मताची मोजणी 25 नोव्हेंबरला होणार असल्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर महायुतीच्या नेत्याची बैठक कोल्हापूर डीसीसी बँकेत बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन मंत्री हसन मुश्रीफ यांनी 'गोकुळ'च्या अध्यक्षपदाबाबत मोठी घोषणा केली.

पत्रकार परिषद घेऊन मंत्री हसन मुश्रीफ यांनी 'गोकुळ'च्या अध्यक्षपदाबाबत मोठी घोषणा केली. यावेळी त्यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका केली. गोकुळच्या अध्यक्षपदाचा निर्णय महायुतीचे नेतेच घेतील, अध्यक्ष कोण होणार हे आम्ही ठरवू, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. 'गोकुळ'चा अध्यक्ष महायुतीचा होणार आहे. मात्र, अध्यक्ष कोण असणार याबाबत मंगळवारी सकाळी महायुतीच्या नेत्याची बैठक घेऊन नावाची घोषणा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी झालेल्या बैठकीला महायुतीमधील भाजप, शिवसेनेचे नेतेमंडळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, 'सीएम फडणवीस यांनी दोघानाही एकत्रित बसून अध्यक्षपदाबाबत निर्णय घेण्यास सांगितले होते. मात्र, सतेज पाटील यांनी चर्चेची तयारी दाखवली नाही. त्यामुळे उद्या होत असलेल्या निवडीवेळी महायुतीचा अध्यक्ष होणार आहे. आमचा उमेदवार उद्या सकाळी ठरणार आहे. तोच अध्यक्ष असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यासोबतच शासन नियुक्त चार संचालकांची नावे मला माहित नाहीत. उद्या सकाळी ते समोर येतील, असे त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सपष्ट केले.

Hasan Mushrif
Gokul chairman election : 'गोकुळ'प्रकरणी सर्वात मोठी बातमी; सतेज पाटील यांना पहिला धक्का, चार संचालकांना मतदान करता येणार, कोर्टात काय घडलं?

दरम्यान हायकोर्टातून आलेल्या या निर्णयानंतर आता पुढच्या काही तासांमध्येच गोकुळची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे.  गोकुळ बाबत उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महायुतीमध्ये हालचाली वाढल्या आहेत.  महायुतीच्या नेत्यांची कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये तातडीची बैठक पार पडली. मंत्री हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील, प्रकाश आबिटकर यांच्यासह महत्त्वाचे नेतेमंडळी उपस्थित होते. 

Hasan Mushrif
Sharad Pawar: शरद पवारांची मोठी घोषणा! शेतीपासून उद्योगांपर्यंत बारामती बनणार एआयचं ग्लोबल हब; स्टार्टअपला मिळणार चालना

दरम्यान, मंगळवारी गोकुळची निवडणूक होणार आहे. जे सदस्य निवडून आले होते, त्या 25 सदस्यांसोबतच शाससाने अध्यादेश काढून ज्या सदस्यांची नियुक्ती केली होती, ते सदस्य देखील मतदान करणार आहेत, परंतु शासन नियुक्त सदस्यांचे मतदान हे वेगळं ठेवलं जाणार आहे. एवढंच नाहीतर निकाल जाहीर करून अध्यक्षांची निवड देखील होणार आहे. परंतु संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया ही अंतिम निकालाच्या अधिन असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.