Kolhapur News: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी समविचारी आघाडीने शशिकांत पाटील चुयेकर यांची निवड केली असून ही निवड वैध ठरवावी अशी याचिका समविचारी आघाडीने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये केली. या दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती अभय आहुजा व न्यायमूर्ती नीरज धोटे यांच्या खंडपिठासमोर शुक्रवारी सुनावणी झाली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसमोर गोकुळच्या नवनिर्वाचित अध्यक्षांबाबत दाखल याचिकेवर सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान कोर्टाने नियमानुसार निकालानंतर १५ दिवसांच्या आत, म्हणजेच ३ नोव्हेंबरपर्यंत चेअरमन निवड पूर्ण होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करत विरोधी १२ संचालकांना कोर्टासमोर म्हणणं मांडण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुनावणीदरम्यान हायकोर्टाने महायुतीच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. गोकुळच्या चेअरमन निवडीच्या बैठकीला महायुतीचे १२ संचालक अनुपस्थित का राहिले? असा सवाल करत कोर्टाने शुक्रवारी (ता. ३०) चेअरमन निवडीची प्रक्रिया का राबवण्यात येऊ नये? अशी विचारणा केली.
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी समविचारी आघाडीने शशिकांत पाटील चुयेकर यांची गुरुवारी निवड केली. मात्र, निवडीसाठी विरोधी आघाडीचे संचालक अनुपस्थित राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवड सभा तहकूब केली होती. त्यामुळे समविचारी आघाडीने गोकुळचे अध्यक्ष शशिकांत पाटील चुयेकर यांच्यासह 13 संचालकांच्या वतीने ॲड. धैर्यशील पवार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये शुक्रवारी याचिका दाखल केली.
महायुतीचे संचालक चेतन नरके यांच्या वकिलांनी कोर्टात बाजू मांडताना सांगितले की, आम्हाला आमची बाजू व म्हणणे मांडण्याची पूर्ण संधी देण्यात यावी. त्यानंतरच यावर अंतिम निर्णय घेण्यात यावा. यावर कोर्टाने महायुतीच्या सर्व १२ संचालकांना २ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीस दरम्यान त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली आहे.
दरम्यान, न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, या याचिकेच्या अंतिम निकालाच्या अधीन राहूनच पुढील सर्व प्रक्रिया व निर्णय वैध ठरतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.