Gokul News: एकीकडे सतेज पाटील - मुश्रीफांची अध्यक्षपदावरुन भांडणं, दुसरीकडे 'गोकुळ'नं शेतकऱ्यांना दिली आनंदाची बातमी

Satej Patil vs Hasan Mushrif : गोकुळनं यंदाही दूध उत्पादकांच्या हिताला प्राधान्य देत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांना मोठी आर्थिक भेट दिली आहे. दूध उत्पादकांनी प्राथमिक दूध संस्थांमार्फत पुरवठा केलेल्या दुधाचा अंतिम दर फरक सणासुदीच्या काळात देण्याची गोकुळची परंपरा आहे.
Gokul chairman Election
Gokul chairman ElectionSarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur News: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीपासून ते अध्यक्ष पदापर्यंत महायुती विरुद्ध समविचारी आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोपांचे खेळ सुरू आहेत. केवळ कोल्हापूर जिल्हा नव्हे तर राज्यात गोकुळ दूध संघाबाबत प्रतिमा मलिन होत असल्याची भावना दूध उत्पादक शेतकऱ्यांची आहे. अध्यक्षपदासाठी महायुती विरुद्ध समविचारी आघाडीमध्ये जुंपली असताना इकडे गोकुळ दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिवाळीच्या तोंडावर आनंदाची बातमी दिली आहे.

गोकुळनं यंदाही दूध उत्पादकांच्या हिताला प्राधान्य देत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांना मोठी आर्थिक भेट दिली आहे. दूध उत्पादकांनी प्राथमिक दूध संस्थांमार्फत पुरवठा केलेल्या दुधाचा अंतिम दर फरक सणासुदीच्या काळात देण्याची गोकुळची परंपरा आहे.

ही परंपरा कायम राखत संघाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील म्हैस व गाय दुधाच्या अंतिम दूध दर फरकापोटी ११७ कोटी ४२ लाख रुपयाची रक्कम खात्यावर जमा केली. दूध उत्पादक शेतकरी हेच गोकुळचे केंद्रबिंदू असून, त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी संघ कटिबद्ध असल्याची माहिती संघाचे कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले यांनी दिली.

कालावधीत गोकुळला पुरवठा केलेल्या म्हैस दुधास (दूध उत्पादकास) सरासरी प्रतिलिटर २ रुपये २५ पैसे (३.८१%) व गाय दुधास (दूध उत्पादकास) सरासरी प्रतिलिटर १ रुपये २५ पैसे (३.५१%) याप्रमाणे दूध संस्थांना अंतिम दूध दर फरक देण्यात आला आहे. दूध संस्थांसाठी प्रतिलिटर सरासरी २० पैसे याप्रमाणे प्राथमिक दूध संस्थांच्या नावावर डिबेंचर्स खाती जमा करण्यात आले आहेत.

Gokul chairman Election
Latur DCC Bank : लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महत्त्वाची अपडेट; अर्ज बाद झालेल्या 13 उमेदवारांना दुसरा मोठा धक्का

गोकुळ संघामार्फत प्रतिवर्षी दिवाळीस अंतिम दूध दर फरक दिला जातो. त्यानुसार यावर्षी संघाने म्हैस दुधाकरिता ६३ कोटी १२ लाख ११ हजार रुपये, तर गाय दुधाकरिता ३९ कोटी १३ लाख ९६ हजार रुपये इतका दूध दर फरक व दर फरकावर ६ टक्के प्रमाणे होणारे व्याज ३ कोटी ४२ लाख ४० हजार रुपये व डिबेंचर व्याज ६.५० टक्के प्रमाणे ११ कोटी ७३ लाख ५९ हजार रुपये, असे एकूण ११७ कोटी ४२ लाख ६ हजार रुपये इतकी रक्कम स्वतंत्र दूध बिलातून दूध संस्थांच्या खात्यावर बँकेत जमा केली आहे.

तसेच लाभांश (डिव्हीडंड) ११ टक्के प्रमाणे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर अदा केले जाईल. या दर फरकाचा लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच सीमाभागातील गोकुळ संलग्न ८ हजार दूध संस्थांच्या सुमारे ५ लाख दूध उत्पादक सभासदांना होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.