Gokul Election 2026 Hasan Mushrif Challenges Satej Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul Dudh Sangh Elections: 'गोकुळ'मध्ये सतेज पाटलांचा 25-0 ने पराभव करणार! हसन मुश्रीफांनी थोपटले दंड

Gokul Election 2026 Hasan Mushrif Challenges Satej Patil: गोकुळच्या निवडणुकीसंदर्भात आमदार सतेज पाटील यांना भ्रमनिरास होईल, महायुती म्हणून ही निवडणूक आम्ही एकत्र लढणार असून फार मोठ्या फरकाने त्यांचा पराभव होणार असल्याने त्यांनी अशा वल्गना करू नयेत.

Rahul Gadkar

Kolhapur News: काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने आमने-सामने आले आहेत. मागील निवडणुकीत खांद्याला खांदा लावून एकत्र लढणाऱ्या मित्रांमध्ये आता या निवडणुकीच्या निमित्ताने विरोधाची ठिणगी पेटली आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीला आपण 25 उमेदवार घेऊन सामोरे जाऊ, अशी घोषणा आमदार सतेज पाटील यांनी केल्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

गोकुळच्या निवडणुकीसंदर्भात आमदार सतेज पाटील यांना भ्रमनिरास होईल, महायुती म्हणून ही निवडणूक आम्ही एकत्र लढणार असून फार मोठ्या फरकाने त्यांचा पराभव होणार असल्याने त्यांनी अशा वल्गना करू नयेत. त्यांचा पराभव 25-0 असा फरकाने होईल, असे भाकीत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात केले आहे.

साखरेच्या दरवाढीवर बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, "यंदा संपलेला गळीत हंगाम केवळ ९० दिवस चालला. त्यामुळे साखरेचे उत्पादन कमी झाले आहे. त्यात ब्राझीलमध्ये अमेरिका-इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर इथेनॉलची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली.

या सर्व गोष्टीचा परिणाम साखरेच्या दरवाढीवर झाला आहे. त्यामुळे केंद्र 10 लाख टन साखर आयात करणार असल्याची माहिती मंत्री मुश्रीफ यांनी दिली. जर यंदाचा हंगाम अधिक काळ चालला असता तर साखर कारखानदारांकडे साखर शिल्लक राहिली असती त्याचा फायदा कारखानदारांना निश्चितपणे झाला असता, असे ते म्हणाले.

'जेन झी'च्या माध्यमातून तरुणांनी बांधलेले संघटन पाहिल्यानंतर सर्वच राज्यकर्ते खडबडून जागे झाले आहेत. सगळेच त्यांना आपलेसे करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगत विरोधकांना टोला लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT