Prithviraj Chavan: महाराष्ट्रात पेपरफुटी रोखता आली नाही, मग फडणवीस केंद्रात शिक्षण खाते कसे सांभाळणार? चव्हाणांचा सवाल

Prithviraj Chavan on Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार अशी चर्चा आहे. केंद्रात फडणवीस शिक्षण मंत्री होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यावर माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे.
Prithviraj Chavan Devendra Fadnavis
Prithviraj Chavan Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on
  1. फडणवीसांना केंद्रात पाठवण्याच्या चर्चेला पृथ्वीराज चव्हाणांचा विरोध का?

  2. महाराष्ट्रातील पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर चव्हाणांनी उपस्थित केला शिक्षण खात्याचा मुद्दा

  3. फडणवीस दिल्लीला गेल्यास महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार?

Prithviraj Chavan News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार अशी चर्चा आहे. गेले काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात या चर्चेने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर बदललेल्या राजकीय स्थितीवर भाष्य केले. या आंदोलनानंतर केंद्रातील भाजप सरकारला धक्का बसला आहे. त्याचे परिणाम स्पष्टपणे जाणवत आहेत.

Prithviraj Chavan Devendra Fadnavis
Maharashtra Government: 57 तहसीलदार झाले उपजिल्हाधिकारी, तरी जुन्या कामातून सुटका नाही; ‘SIR’मुळे मोठा ट्विस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार अशी चर्चा आहे. केंद्रात फडणवीस शिक्षण मंत्री होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यावर माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे.

महाराष्ट्रात पेपर फुटीच्या अनेक घटना घडल्या आहेत. अनेक शैक्षणिक प्रश्न गंभीर आहेत. शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचार वाढत आहे. त्याचे अनेक प्रकार सध्या चर्चेत आहेत.

महाराष्ट्रात पेपर फुटले असताना त्यावर मुख्यमंत्र्यांना गंभीर स्वरूपाचे निर्णय घेता आले नाहीत. त्यांना केंद्रात शिक्षण मंत्री कसे करणार? देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तसा कोणता अनुभव आहे. त्यांना केंद्रात शिक्षणमंत्री केल्यास शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचाराची प्रथा वाढेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

Prithviraj Chavan Devendra Fadnavis
PMC News: पुण्यात राष्ट्रवादीच्या आणखी एका नगरसेवकाला दणका: भाजपने 12 कोटींचा निधी काढून घेतला; चंद्रकांतदादांच्या विरोधातील सही महागात पडली?

शक्तीपीठ मार्गाला कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. त्या विरोधात शुक्रवारी मोठे आंदोलन झाले. पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी शक्तीपीठ मार्गाला काँग्रेसचा कडाडून विरोध असल्याचे स्पष्ट केले. नागरिकांनी कोणतीही मागणी केली नसताना राज्य सरकार हा मार्ग करण्याचा अट्टहास का धरत आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com