Dhananjay Mahadik, Satej Patil, Hasan Mushrif Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul Dudh Sangh: गोकुळच्या कारभारामुळे शेतकऱ्यांवर गाय-म्हशी विकण्याची वेळ; महाडिकांचा मुश्रीफ-पाटलांवर हल्लाबोल

Sunil Balasaheb Dhumal

Kolhapur Political News : 'शौमिका महाडिक या सत्य बोलतात, सत्यासाठी त्या लढत आहेत. लेखा परिक्षणात दोष नसता तर गोकुळची याचिका न्यायालयाने फेटाळली नसती. गोकुळच्या कारभारामुळे शेतकऱ्यांवर गाई-म्हशी विकाण्याची वेळ आल्याचा' आरोप करून खासदार धनजंय महाडिकांनी मंत्री हसन मुश्रीफ आणि माजी मंत्री आमदार सतेज पाटलांवर हल्लाबोल केला. शेतकऱ्यांना दिलेला एकही शब्द गोकुळचे सत्ताधारी पूर्ण करत नसल्याची टीकाही महाडिकांनी केली. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. (Latest Political News)

'दूध उत्पादक शेतकऱ्यांना दोन रुपये जास्त देऊ, वासाचे दूध परत घेऊ', असा अजेंडा घेऊन कारभारी गोकुळ (Gokul Dudh sangh)मध्ये सत्तेत आले. त्यातील आता काहीही पूर्ण होताना दिसत नाही. गोकुळमध्ये काहीतरी काळबेर आहे, म्हणूनच शौमिका लढत आहेत. दूध वाढवू म्हणणारे आता गावोगावी म्हशी घ्या, म्हणून फिरत आहेत. यांच्या त्रासाला कंटाळून दूध उत्पादकांनी गायी-म्हशी विकल्या, अशी घणाघाती टीका खासदार महाडिकांनी मंत्री मुश्रीफ आणि माजी पालकमंत्री सतेज पाटलांवर नाव न घेता केली आहे.

धनंजय महाडिक म्हणाले, "गोकुळचे लेखापरिक्षण सदोष असल्यानेच न्यायालयाने सत्ताधाऱ्यांची याचिका फेटाळली आहे. शौमिका महाडिक या दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी लढत आहेत. गोकुळला राजाश्रयची गरज नाही. गोकुळ दूध संघ तर दूध उत्पादक शेतकऱ्यांमुळेच मोठा झाला आहे. शौमिका यांचा अहवालातील दोष व त्रुटीच्या विरोधात लढा आहे. ते न्यायालयाच्या पुढच्या कारवाईत स्पष्ट होईल," असेही महाडिकांनी यावेळी सांगितले.

सतेज पाटलांना खोचक टोला

कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसची जनसंवाद पदयात्रा होणार आहे. यावर महाडिक म्हणाले, "राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने काय साध्य झाले, माहिती नाही. पण वरिष्ठाकडून सूचना असतील म्हणूनच जिल्ह्यात पदयात्रा निघत असेल. जिल्ह्यातील नेत्यांना माझ्याकडून शुभेच्छा," असा खोचक टोलाही महाडिकांनी (Satej Patil) सतेज पाटलांना लगावला आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांचे जंगी स्वागत करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. "उपमुख्यमंत्री हे पक्षाच्या कार्यक्रमासाठी कोल्हापुरात येत आहेत. ते आमच्याच युतीतील एक घटक आहेत. भाजपकडून त्यांचे जोरदार स्वागत करणार आहे."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT