Satej Patil Wins Gokul Election 2026 Satej Patil Wins Gokul Election 2026
पश्चिम महाराष्ट्र

Gokul Election Final Result: गोकुळवर अखेर सतेज पाटलांचा झेंडा! चुरशीच्या लढतीत महायुतीला धूळ चारत उधळला गुलाल

Gokul Election Final Result: राज्यात गेल्या सहा महिन्यांपासून प्रचंड चर्चेत आलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या अर्थात गोकुळच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला.

Amit Ujagare

Gokul Election Final Result: राज्यात गेल्या सहा महिन्यांपासून प्रचंड चर्चेत आलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या अर्थात गोकुळच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. रात्री साडे नऊ वाजेपर्यंत अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत अखेर सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीनं १३ जागा जिंकत विजयाचा झेंडा रोवला. तर महायुतीला १२ जागा जिंकत पराभवाचा सामना करावा लागला.

विजयी उमेदवारांची यादी

सर्वसाधारण गट

  1. अभिजित प्रभाकर तायशेटे (सतेज पाटील)

  2. शशिकांत आनंदराव पाटील चुयेकर (सतेज पाटील)

  3. राहुल पांडुरंग पाटील (महायुती)

  4. ⁠चेतन अरुण नरके (महायुती)

  5. अजित शशिकांत नरके (महायुती)

  6. किसन बापूसो चौगले (सतेज पाटील)

  7. अंबरीषसिंह संजय घाटगे (महायुती)

  8. बाबासाहेब श्रीपती चौगले (सतेज पाटील)

  9. राहुल बजरंग देसाई (सतेज पाटील)

  10. विद्याधर बाबुराव गुरबे (सतेज पाटील)

  11. विरेंद्र संजय मंडलिक (महायुती)

  12. मदन बाबुराव देसाई (महायुती)

  13. बाबासाहेब विष्णू देवकर (सतेज पाटील)

  14. राजेश नरसिंगराव पाटील (महायुती)

  15. रणजितसिंह दिलीपराव पाटील (महायुती)

  16. रणजितसिंह कृष्णराव पाटील (महायुती)

  17. अजित पांडुरंग पाटील (महायुती)

  18. कर्णसिह गायकवाड (महायुती )

  19. विश्वजीत दिनकरराव जाधव (सतेज पाटील)

  20. अमर पाटील कोडोली (महायुती)

महिला राखीव गट

१. अंजना केदारी रेडेकर (सतेज पाटील)

२. भाग्यश्री धीरज डोंगळे (सतेज पाटील)

इतर मागासवर्गीय गट

१. शशिकांत शामराव खोत (सतेज पाटील)

अनुसूचित जाती गट

१. राजू बाबा आवळे (सतेज पाटील)

भटक्या-विमुक्त जमाती गट

१. बयाजी शेळके (सतेज पाटील)

एकूण निकाल :

समविचारी आघाडी (सतेज पाटील) - 13

महायुती - 12

चुरशीची निवडणूक

गोकुळची मतमोजणीला सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात झाली. यामध्ये सुरुवातीला महायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर होते, पण त्यानंतर चित्र हळूहळू बदलायला लागलं आणि सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या उमेदवारांनी चांगली आघाडी घेतली. दुपारी २ वाजेपर्यंत समविचारी आघाडीचे १४ उमेदवार आघाडीवर होते तर महायुतीचे ११ उमेदवार आघाडीवर होते. त्यानंतर सतेज पाटील समर्थकांनी जल्लोष करायला आणि गुलाल उधळायला सुरुवात केली.

पण नंतर हा ७ वाजण्याच्या सुमारास सतेज पाटलांचा एक उमेदवार पिछाडीवर पडला आणि हा एकडा १३ विरुद्ध १२ असा झाला. त्यानंतर पुन्हा तासाभरात महायुतीच्या युवराज पाटील आणि विश्वास पाटील या उमेदवारांनी मतमोजणीवर घेतला आणि फेरमतमोजणीची मागणी केली त्यानंतर ठोस कारण न दिल्यानं अखेर रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास निवडणूक अधिकाऱ्यांनी ही मागणी फेटाळली. त्यामुळं अंतिम निकाल समविचारी आघाडीचे १३ विरुद्ध महायुतीच्या शेतकरी आघाडीचे १२ असा जाहीर करण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT