Gokul Election; devendra fadnavis, Dhananjay Mahadik, satej patil And Hasan Mushrif sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dhananjay Mahadik : 'तुम्ही ठरावात मोठे भाऊ असालं, पण आम्ही संचालक मंडळात'; धनंजय महाडिकांनीं मुश्रीफांना डिवचले

Dhananjay Mahadik Targets Satej Patil and Hasan Mushrif Over Gokul Election : गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राज्य सभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्यावर निशाना साधला आहे.

Rahul Gadkar

Kolhapur Politics : गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपने शक्तीप्रदर्शन करत ठराव दाखल केले. कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल येथे झालेल्या मेळाव्यात खासदार धनंजय महाडिक यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिमटे काढले.

खासदार महाडिक म्हणाल, राज्यात एकमेव असा कोल्हापूर जिल्हा आहे. ज्या जिल्ह्यात एकही शेतकऱ्यांची आत्महत्या होत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी अध्यक्ष अरुण नरके यांच्या नेतृत्वाखाली गोकुळ दूध संघ चालत आला आहे, त्याचे हे महत्वाचे कारण आहे.

गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके आपल्यासोबत आल्याने काँग्रेसची ताकद कमी झाली आहे. आम्हाला शिकवण होती. सहकारात पक्षीय राजकारण आणायचे नाही. पण मागील निवडणुकीत माजी पालकमंत्र्यांनी महाविकास आघाडीचे पॅनेल उभा केले. पक्षीय राजकारण दूध संघात आणले.

आता त्यांनी महायुती विरुद्ध शेतकरी असे बॅनर लावायला सुरु केले आहे. पण आता ही निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आहे. आज महाडिक साहेबांनी एक एक्का व्यासपीठावर आणला आहे. अजून तीन एक्के बाकी आहे. आज आपल्याकडे 1431 ठराव आहेत. यामध्ये कोणतेही बोगस ठरावधारक नाहीत.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईत बैठक घेतली. गोकुळच्या निवडणुकीला महायुती म्हणून एकत्र जाण्याच्या सूचना दिल्या. पण तोपर्यंत आपल्या ताकदनुसार ठराव गोळा करा. अशा सूचना दिल्या आहेत. परवा राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा झाला. ठराव गोळा करताना कोणीही मोठा भाऊ असला तरी संचालक मंडळात भाजपचं मोठा भाऊ असेल, असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT