Dhananjay Mahadik : मुन्ना - बंटी वाद पेटणार! साम, दाम दंड भेद वापरा, धनंजय महाडिकांनी थेट टार्गेटवर घेतले...

Gokul Election News : कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय महाडिक यांनी विरोधकांवर टीका करत दबाव राजकारणाला विरोध केला. कार्यकर्त्यांना साम-दाम-दंड-भेद वापरण्याचा सल्ला दिल्याने राजकारण तापले.
BJP MP Dhananjay Mahadik addressing party workers during a meeting on the upcoming Gokul Milk Union election in Kolhapur.
BJP MP Dhananjay Mahadik addressing party workers during a meeting on the upcoming Gokul Milk Union election in Kolhapur.Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Gokul Election News : गोकुळ दूध संघाची निवडणूक पुन्हा एकदा गाजण्याची शक्यता आहे. यंदा ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी होणार असली तरी यंदाची निवडणूक पुन्हा एकदा बंटी आणि मुन्ना यांच्यातील वादाला पुन्हा उकळी फोडणारी आहे. निवडणूक टप्प्यात असताना शुक्रवारी (ता.6) भाजपकडून प्राथमिक दूध संस्था, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती आणि कार्यकर्त्यांची बैठक घेत गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

या बैठकीत राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी, राज्यात महायुतीची सत्ता आहे. दबावाचे राजकारण चालणार नाही. गाडया बंद करतो, ठेका बंद करतो असल्या धमक्या कोणी देत असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही. विरोधकांच्या कोणत्याही दडपशाहीला बळी न पडता साम-दाम-दंड-भेद या सर्वांचा वापर करा, अशा शब्दात कार्यकर्त्यांना मंत्र देऊन गोकुळच्या निवडणुकीचा प्रचार तापवला आहे.

गोकुळची निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढविणार आहोत. महायुती म्हणून एकत्र लढवू आणि जिंकू ही. विरोधी काँग्रेस आघाडीचा एकही संचालक निवडून येणार नाही. विरोधकांच्या दबावाची चिंता करू नका. ज्याच्या खिशात ठराव जास्त त्याची सदस्य संख्या जास्त या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी पुढच्या या महिन्याभरामध्ये जास्तीत जास्त ठराव जमा करावेत. असे सांगत विरोधकांच्या दडपशाहीला बळी न पडता निवडणूक जिंकण्यासाठी सगळी रसद पुरू साम, दाम, दंड, भेद या नितीचा अवलंब करा'असे आवाहनही खासदार महाडिक यांनी केले.

BJP MP Dhananjay Mahadik addressing party workers during a meeting on the upcoming Gokul Milk Union election in Kolhapur.
Gokul Dudh Sangh Election: 'गोकुळ'च्या निवडणुकीत मुश्रीफांचा एका गोष्टीला विरोध; घातली 'ही'अट

मंत्री चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार विनय कोरे यांच्यासह महायुतीतील सर्व नेते मंडळीनी महायुती म्हणून गोकुळची निवडणूक लढविणार असल्याचा निर्णय घेतला असल्याचे महाडिक यांनी सांगितले. महाडिक म्हणाले, गोकुळच्या निवडणूकीत महाविकास आघाडीचे आव्हान नाही.

BJP MP Dhananjay Mahadik addressing party workers during a meeting on the upcoming Gokul Milk Union election in Kolhapur.
Kolhapur News: महायुतीकडून शेवटच्या दहा मिनिटांत राष्ट्रवादीचा 'करेक्ट कार्यक्रम'; परिवहन समितीचं सभापतीपद हातून निसटलं

तुम्हाला सगळ्या पद्धतीचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही आमच्यावर आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आपल्या सोबत धोका झाला. धोका कसा झाला, काय झालं आता त्याची चर्चा नको. पण यंदा निवडणूक जिंकायची हे ध्येय डोळ्यासमोर ठेवा, असे महाडिक म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com