Gokul Politics : गोकुळ दूध संघाची निवडणूक अंतिम टप्प्यात आले असून ऐन गणेशोत्सवातच या निवडणुकीचे वातावरण तापणार असल्याचे चित्र आहे. येत्या 4 सप्टेंबर रोजी गोकुळ दूध संघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार असल्याने दहा सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, प्रभारी विभागीय उपनिबंधक (दुग्ध) यांच्याकडे आज ४१० संस्थांबाबत हरकतींवर सुनावणी झाली. यामध्ये या संस्थांना अंतिम मतदार यादीत स्थान देऊ नये. चुकीच्या पद्धतीने यांची नोंदणी झाली असल्याची हरकत घेतली. यावर याबाबत सहकार न्यायालयात सुनावणी सुरू असून, तो निर्णय होईपर्यंत याबाबत कोणताही निर्णय घेऊ नये, अशी बाजू मांडण्यात आली. प्रभारी विभागीय उपनिबंधक नारायण परजाने यांच्यासमोर ही सुनावणी झाली.
गोकुळची निवडणूक ६० दिवसांत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे माघारीसाठीचा वेळ कमी करून वेळेत निवडणूक घेण्याचे प्रयत्न निवडणूक प्रशासनाकडून सुरू झाल्याचे समजते. साधारण पुढील सोमवारपासून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महसूल उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती करण्याच्या हालचाली सुरू आहेत. निवडणूक कार्यालय ताराबाई पार्क येथील गोकुळ दूध संघाच्या इमारतीत होण्याची शक्यता आहे.
याच परिसरात मंडप उभा करून कार्यालय तयार करण्याची प्राथमिक तयारी सुरू आहे. तसेच १०-११ सप्टेंबरला उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येतील. साधारण ३० सप्टेंबरपर्यंत निवडणुकीची प्रत्यक्षातील प्रक्रिया होईल. पुढील १०-१५ दिवसांत प्रचार, मतदान होईल. निकाल लागून साधारण घटस्थापनेच्या पूर्वी नवीन संचालक मंडळ अस्तित्वात येईल, अशी शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.