Gokul Election Hasan Mushrif  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul Election News: 'कागलची अब्रू वाचवा, देवी जागृत आहे, अंगावर उठेल...' 'गोकुळ'च्या निवडणुकीत सभासदांना देवीच्या प्रकोपाची भीती

Kolhapur Politics: गोकुळ दूधसंघ निवडणुकीच्या संदर्भात सध्या आचारसंहिता सुरू असताना प्रमुख राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींकडून सर्व नियम धाब्यावर बसवले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आचारसंहितेच्या काळातच महत्त्वाच्या नेत्यांकडून कर्नाटकातील सौंदत्ती येथे जाऊन सभासदांकडून शपथा घेतल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News: गोकुळ दूध संघाची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आले असताना सभासदांना सहलीवर पाठवण्यात आले आहे. अशातच कोणत्याच नेत्याकडून आणि सभासदांकडून दगाफटका होणार नाही यासाठी देवीच्या शपथा आणि भंडारा उचलण्यासाठी महायुतीच्या नेत्यांकडून धक्कादायक प्रयत्न सुरू झाल्याचं समोर येत आहे.

गोकुळ दूधसंघ निवडणुकीच्या संदर्भात सध्या आचारसंहिता सुरू असताना प्रमुख राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींकडून सर्व नियम धाब्यावर बसवले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आचारसंहितेच्या काळातच महत्त्वाच्या नेत्यांकडून कर्नाटकातील सौंदत्ती येथे जाऊन सभासदांकडून शपथा घेतल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमधून मंत्री हसन मुश्रीफ हे देवीच्या प्रकोपाची भीती हे सभासदांना घालताना दिसत आहेत. सर्व 25 उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आणि त्याची शपथ घेण्यासाठी सौंदती डोंगरावर आलो आहे. माझ्यासकट सर्वांनी शपथ घ्यायची असल्याचं ते सांगताना दिसून येत आहे.

हसन मुश्रीफ व्हिडीओमध्ये सभासदांना म्हणतात, माझ्यासह सर्वांनी शपथ घ्यायची की, मी गद्दारी करणार नाही. त्यासाठी दोन अडीच तास लागतील. कागलची अब्रू वाचवण्याचे आता तुमच्या हातात आहे. आमची शपथ तुम्हाला आहे.

तसेच यल्लामा देवी किती जागृत आहे. हे तुम्हाला माहिती आहे. जे खोटं करेल तर अंगावर उठते, असे भाषणादरम्यान मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ म्हणतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आहे.

ही सामान्य निवडणूक नाही. आमची आणि मंत्री हसन मुश्रीफ यांची कॉलर खाली होता कामा नये. ती ताठ राहिली पाहिजे. तुमच्यासोबत आम्हीही शपथ घेणार आहे. शपथ घेताना इतकंच म्हणायचं आहे. " महायुतीच्या 25 या सर्व उमेदवारांना मतदान करायचं आहे. कपबशीला मतदान करणार आहे. आई यल्लामा आम्ही शपथ घेतो, असे भाषण करताना राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

महाराष्ट्र सीमा भागातील जागृत देवस्थान रेणुका देवीचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी मनोभावे दर्शन घेतले. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) या दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीचे सर्व उमेदवार येत्या निवडणुकीत प्रचंड मतांनी निवडून येऊ दे असे रेणुकादेवी चरणी साकडे घातले.

यावेळी राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार संजयदादा मंडलिक, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पाताई खोत, माजी आमदार संजयबाबा घाटगे, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, जिल्हा परिषद सदस्या सौ. सुयशा घाटगे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT