Kolhapur politics Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satej Patil : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; फेरमतमोजणीत आकडे फिरले अन् सतेज पाटलांना एका जागेवर धक्का

Kolhapur Gokul Milk Union News : कोल्हापुरातील गोकुळ दूध महासंघाच्या निवडणुकीत ऐन वेळी मोठा ट्विस्ट आला आहे. एका जागेसाठी मतमोजणी पुन्हा करण्यात आली आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : कोल्हापुरातील गोकुळ दूध महासंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी सकाळपासूनच मतमोजणी सुरु आहे. सुरुवातीपासून महायुती व सतेज पाटील यांच्या पॅनेलमध्ये जोरदार चुरस पाहवयास मिळाली. त्यानंतर तिसऱ्या फेरीननंतर सतेज पाटील यांच्या पॅनेलचे उमेदवार आघाडीवर होते. त्यामुळे 25 पैकी 15 जागांवर सतेज पाटील यांच्या पॅनेलचे उमेदवार आघाडीवर होते. तर महायुतीचे दहा जागी आघाडीवर होते. मात्र, त्यानंतर फेरमतमोजणीत आकडे बदलल्याने पुन्हा सतेज पाटील यांच्या जागा 14 झाल्या होत्या. परंतु त्यानंतर एका जागेवरील फेरमतमोजणीनंतर मोठा ट्विस्ट पहावयास मिळाला. या मोजणीनंतर आकडे फिरले अन् सतेज पाटलांना एका जागेवर धक्का बसला आहे. समोर आलेल्या निकालानुसार सतेज पाटील यांच्या पॅनेलची एकूण 13 जागांवर आघाडी आहे. तर महायुती 12 जागांवर आघाडी असल्याचे समोर आले आहे.

कोल्हापुरातील गोकुळ दूध महासंघाच्या निवडणुकीत ऐन वेळी मोठा ट्विस्ट आला आहे. एका जागेसाठी मतमोजणी पुन्हा करण्यात आली आहे. याच मतमोजणीनंतर सतेज पाटील यांच्या पॅनेलची एक जागा कमी झाली आहे. त्यातच आता मतमोजणीनंतर महायुतीची एक जागा वाढली आहे. तर सतेज पाटील यांच्या पॅनेलची एक जागा कमी झाली आहे. याच एका जागेसाठी पुन्हा मतमोजणी करण्यात आली. त्यानंतर सतेज पाटील यांच्या पॅनेलचे सचिन घोरपडे हे पिछाडीवर आहेत. तर दुसरीकडे महायुतीचे उमेदवार अमर पाटील हे आघाडीवर असल्याचे समजते. .

सतेज पाटील यांनी व्यक्त केला संताप

सतेज पाटील (Satej Patil) यांच्या पॅनेलच्या एका उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर मात्र सतेज पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. मतमोजणीला मुद्दामहून उशीर केला जातोय, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. असे असले तरी सत्तेत बसण्यासाठी जो जादुई आकडा लागतो तो सतेज पाटील यांनी गाठला आहे. त्यामुळे तेच आता यापुढे गोकुळचा कारभार हाकणार, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोल्हापूर गोकुळ निकाल :

समविचारी आघाडी सतेज पाटील – 13 जागी आघाडीवर

महायुती -12 जागी आघाडीवर

आघाडीवर असलेल्या उमेदवारांची यादी पॅनेलप्रमाणे पुढीलप्रमाणे :

सर्वसाधारण गट :

१. अभिजित प्रभाकर तायशेटे (सतेज पाटील)

२. शशिकांत आनंदराव पाटील चुयेकर (सतेज पाटील)

३. राहुल पांडुरंग पाटील (महायुती) ⁠

४. चेतन अरुण नरके (महायुती)

५. अजित शशिकांत नरके (महायुती)

६. किसन बापूसो चौगले (सतेज पाटील)

७. अंबरीषसिंह संजय घाटगे (महायुती)

८. बाबासाहेब श्रीपती चौगले (सतेज पाटील)

९. राहुल बजरंग देसाई (सतेज पाटील)

१०. विद्याधर बाबुराव गुरबे (सतेज पाटील)

११. विरेंद्र संजय मंडलिक (महायुती)

१२. मदन बाबुराव देसाई (महायुती)

१३. बाबासाहेब विष्णू देवकर (सतेज पाटील)

१४. राजेश नरसिंगराव पाटील (महायुती)

१५. रणजितसिंह दिलीपराव पाटील (महायुती)

१६. रणजितसिंह कृष्णराव पाटील (महायुती)

१७. अजित पांडुरंग पाटील (महायुती)

१८. कर्णसिह गायकवाड (महायुती )

१९. विश्वजीत दिनकरराव जाधव (सतेज पाटील)

२०. अमर पाटील कोडोली (महायुती)

महिला राखीव गट :

१. अंजना केदारी रेडेकर (सतेज पाटील)

२. भाग्यश्री धीरज डोंगळे (सतेज पाटील)

इतर मागासवर्गीय गट :

१. शशिकांत शामराव खोत (सतेज पाटील)

अनुसूचित जाती गट :

१. राजू बाबा आवळे (सतेज पाटील)

भटक्या-विमुक्त जमाती गट :

१. बयाजी शेळके (सतेज पाटील)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT