Gokul Election Result : महायुतीला धक्क्यावर धक्के! मुश्रीफांच्या सुपुत्रासह दिग्गजांना पराभवाचा फटका; माजी आमदाराचाही पराभव; विनय कोरेंनाही धक्का

Mahayuti Setback In Gokul Election : कोल्हापूर जिल्हा दूध संघ म्हणजेच गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला धक्क्यावर धक्के बसले असून दिग्गजांना पराभव पाहावा लागला आहे. सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू समविचारी आघाडीचे 14 उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर आहेत.
Gokul Election Results; Mahayuti Leader, Satej Patil
Gokul Election Results; Mahayuti Leader, Satej PatilSarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur Gokul Election Results News : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीत मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली आहे. काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने १४ जागांवर विजय मिळवल्याचा दावा करण्यात येत असून, महायुतीच्या वाट्याला ११ जागा आल्याचे चित्र समोर आले आहे. या निकालामुळे महायुतीतील अनेक दिग्गजांना धक्का बसल्याची चर्चा आहे.

राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळच्या निवडणुकीत अनेक नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने बहुमताचा १३ जागांचा आकडा पार केल्याने गोकुळच्या सत्तासमीकरणात मोठा बदल झाल्याचे दिसत आहे. मात्र, सर्व जागांचे अधिकृत निकाल आणि फेरमतमोजणीसंदर्भातील निर्णय यांची अंतिम पडताळणी महत्त्वाची आहे.

महायुतीतील दिग्गजांना धक्का

गोकुळच्या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र आणि संघाचे अध्यक्ष नावीद मुश्रीफ यांना पराभवाचा सामना करावा लागल्याचे वृत्त आहे. इतर मागासवर्गीय गटात समविचारी आघाडीचे शशिकांत शामराव खोत यांनी बाजी मारल्याचे सांगितले जात आहे. गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे आणि विश्वास पाटील यांनाही या निवडणुकीत फटका बसल्याचे चित्र समोर आले. अनेक वर्षांपासून संघाच्या राजकारणात प्रभाव असलेल्या नेत्यांना मतदारांनी दिलेला हा धक्का मानला जात आहे.

Gokul Election Results; Mahayuti Leader, Satej Patil
Gokul election result : मंत्री मुश्रीफांच्या लेकाला पराभवाचा झटका देणारा जायंट किलर कोण? सतेज पाटलांच्या उमेदवाराचा नादखुळा

शौमिका महाडिक यांच्या निकालावरून वाद

गोकुळच्या निवडणुकीत शौमिका अमल महाडिक यांच्या निकालाकडेही सर्वांचे लक्ष लागले होते. त्या महायुतीप्रणित छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीकडून महिला राखीव गटात निवडणूक लढवत होत्या. उपलब्ध माहितीनुसार, फेरमतमोजणीनंतर त्यांचा सात मतांनी पराभव झाल्याचे सांगितले जात आहे. या फेरमतमोजणीच्या मागणीवरून मतमोजणी केंद्रावर वाद निर्माण झाला. या प्रकरणात अंतिम निर्णय अद्याप स्पष्ट नसल्याचे वृत्त आहे. त्यामुळे शौमिका महाडिक यांच्या निकालाबाबत अधिकृत घोषणेची प्रतीक्षा महत्त्वाची ठरणार आहे.

शौमिका महाडिक या भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या सून आणि भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या भावजय आहेत. त्या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षही राहिल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या पराभवाच्या वृत्ताला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

माजी आमदार सुजित मिणचेकर यांचाही पराभव

गोकुळच्या निवडणुकीत अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी गटातून माजी आमदार डॉ. सुजित वसंतराव मिणचेकर यांना पराभव पत्करावा लागल्याचे वृत्त आहे. तसेच आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षाच्या उमेदवारांनाही यश मिळाले नसल्याचे सांगितले जात आहे. अमरसिंह पाटील आणि कर्णसिंह गायकवाड या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागल्याची माहिती आहे.

गोकुळ निवडणूक : पॅनेलनिहाय विजयी उमेदवार

सतेज पाटील गटाचे विजयी उमेदवार — १४

सर्वसाधारण गट

अभिजित प्रभाकर तायशेटे

शशिकांत आनंदराव पाटील चुयेकर

किसन बापूसो चौगले

बाबासाहेब श्रीपती चौगले

राहुल बजरंग देसाई

विद्याधर बाबूराव गुरबे

बाबासाहेब विष्णू देवकर

सचिन दौलतराव घोरपडे

विश्वजीत दिनकरराव जाधव

महिला राखीव गट

10. अंजना केदारी रेडेकर

11. भाग्यश्री धीरज डोंगळे

इतर मागासवर्गीय गट

12. शशिकांत शामराव खोत

अनुसूचित जाती गट

13. राजू बाबा आवळे

भटक्या-विमुक्त जमाती गट

14. बयाजी शेळके

महायुतीचे विजयी उमेदवार — ११

सर्वसाधारण गट

राहुल पांडुरंग पाटील

चेतन अरुण नरके

अजित शशिकांत नरके

अंबरीषसिंह संजय घाटगे

विरेंद्र संजय मंडलिक

मदन बाबुराव देसाई

राजेश नरसिंगराव पाटील

रणजितसिंह दिलीपराव पाटील

रणजितसिंह कृष्णराव पाटील

अजित पांडुरंग पाटील

युवराज दत्ताजीराव पाटील

Gokul Election Results; Mahayuti Leader, Satej Patil
Gokul Election Result : गोकुळ'च्या निवडणुकीत पुन्हा ट्विस्ट, शौमिका महाडिक फेरमतमोजणीची मागणी, मतमोजणी केंद्रावर गोंधळ, सतेज पाटील पोहोचले!

गोकुळच्या सत्तासमीकरणात मोठा बदल

गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने मिळवलेले यश कोल्हापूरच्या सहकार आणि राजकारणात महत्त्वाचे मानले जात आहे. महायुतीतील प्रमुख नेत्यांना बसलेले धक्के आणि राखीव गटांतील निकाल यामुळे या निवडणुकीची चर्चा रंगली आहे. फेरमतमोजणीसंदर्भातील अंतिम निर्णय आणि अधिकृत निकालपत्रकानंतरच सर्व निकालांचे अंतिम चित्र स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com