Shoumika Mahadik  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul Election Result : मोठी बातमी! शौमिका महाडिक पराभूत, 'गोकुळ'मध्ये धक्कादायक निकाल, सतेज पाटलांची बाजी!

Shoumika Mahadik Defeat : गोकुळ निवडणुकीत धक्कादायक निकाल लागला आहे. माजी जिल्हा परिषदच्या अध्यक्ष शैमिका महाडिक यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Roshan More

Gokul News : 'गोकुळ'मध्ये महायुतीचा पराभव निश्चित झाला असून सतेज पाटील यांची समविचार आघाडी 14 जागांवर पुढे आहे. मात्र, या निवडणुकीत महायुतीच्या दिग्गज नेत्या शौमिका महाडिक या पराभूत झाल्या आहेत.

महायुतीच्या दिग्गज नेत्यांना या निवडणूक पराभव पत्कारावा लागला. तब्बल माजी तीन अध्यक्ष पराभूत झाले आहे. माजी अध्यक्ष अरुण डोंगळे, विश्वास पाटील आणि नाविद मुश्रीफ हे पराभूत झाले आहेत.

गोकुळच्या निवडणुकीत महायुतीमधील सर्व मित्रपक्ष एकत्र आले होते. जागावाटप मुंबईतून मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने झाले होते. त्यामुळे महायुतीमधील अंतर्गत संघर्ष संपल्याची चर्चा होती. त्यातच आमदार आणि खासदारांची संख्या आपल्याकडे जास्त असल्याने महायुतीमधील नेत्यांना विजयाची खात्री होती. मात्र, सतेज पाटील यांनी गोकुळच्या खासगीकरणाचा विरोधकांचा डाव असल्याचे मुदद्दा प्रचारात आणून आघाडी घेतली होती.

शौमिका महाडिक या दिग्गज उमेदवार होत्या. त्या भाजपच्या जिल्हा महिला अध्यक्ष आहेत. तसेच त्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आहेत. तसेच विद्यामान आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी आहेत. खासदार धनंजय महाडिक हे त्यांचे दीर आहेत. गोकुळमध्ये त्या संचालिका देखील होत्या. त्यामुळे त्यांचा पराभव हा महायुतीला मोठा धक्का आहे.

हसन मुश्रीफ बॅकफूटवर

हसन मुश्रीफ यांनी आपल्याकडे सर्वाधिक ठराव असल्याचे सांगत महायुतीमध्ये सर्वाधिक जागा लढल्या होत्या. त्यांना भाजपमधून काही नेत्यांचा टोकाचा विरोध होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर ही निवडणूक महायुतीने एकत्र लढली. मात्र, मुश्रीफ यांचे पुत्र नाविद यांना पराभवाचा सामाना करावा लागला आहे.त्यामुळे मुश्रीफांच्या राजकारणाची पिछेहाट झाल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT