Gokul Election : 'गोकुळ'चा आज निकाल! राजकीय नेत्यांसाठी सत्ता का महत्त्वाची? सतेज पाटील की महायुती...

Gokul Election Analysis : जिल्ह्यातील ५ ते साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकरी गोकुळशी थेट जोडलेले आहेत. संघाची आर्थिक उलाढाल मोठी आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात गोकुळमधील सत्ता महत्त्वाची ठरते.
Gokul Election Analysis : Satej Patil, Hasan Mushrif Dhananjay Mahadik
Gokul Election Analysis : Satej Patil, Hasan Mushrif Dhananjay Mahadiksarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur Politics : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच 'गोकुळ'ची निवडणुकीचा आज निकाल आहे. केवळ एक दूध संघ असलेल्या एका निवडणुकीकडे कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. कार्यकर्त्यांमध्ये मला आमदारकी किंवा जिल्हा परिषद सदस्यत्व नको, पण एकदा गोकुळचा संचालक करा" अशी मागणी असते. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या भविष्याच्या दृष्टिने ही निवडणूक आणि तिचा निकाल का महत्त्वाचा आहे, हे समजून घेऊ.

गोकुळ हा कोल्हापूर जिल्ह्याचा ब्रँड आहे. या दूध संघाची आर्थिक उलाढाल जवळपास ५ हजार कोटींपेक्षा अधिक आहे. परंतु ही आर्थिक उलाढाल केवळ आकड्यात मोजून चालत नाही. कारण दुधाच्या वाहतुकीसाठी लागणारे टँकर्स, टेम्पो, दूध एजन्सी, दूधापासून बनवण्यात येणारे तूप, श्रीखंड, बासुंदी असे उपपदार्थ, पशुखाद्य आणि प्रक्रिया उद्योग या संपूर्ण साखळीचा विचार केल्यास 10 हजार कोटीहून अधिक उलाढाल होत असल्याची शक्यता आहे. यातून मोठी रोजगार निर्मिती देखील होती. त्यामुळे आर्थिक संपन्नता येण्यासाठी राजकीय नेत्यांसाठी 'गोकुळ' महत्त्वाचा ठरतो.

थेट शेतकऱ्यांची कनेक्ट

जिल्ह्यातील ५ ते साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकरी गोकुळशी थेट जोडलेले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांची येथील संचालकांचा थेट कनेक्ट निर्माण होतो. आपली राजकीय भवितव्य घडवण्यासाठी या कनेक्टचा मोठा वापर होतो.

राजकीय विश्लेषक सांगतात की, गोकुळ संचालक झाला म्हणजे त्याची पुढची राजकीय कारकिर्दसाठी आवश्यक असलेली ताकद मिळते. जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुका यामध्ये या संचालकांना प्रभाव पाडतो येतो.

Gokul Election Analysis : Satej Patil, Hasan Mushrif Dhananjay Mahadik
Gokul Election : बाळूमामाची शपथ मोडल्यास ब्रेन स्ट्रोक, गोकुळच्या निवडणुकीत 'धार्मिक तांडव'; माजी आमदाराचे धक्कादायक विधान

जिल्ह्याचे राजकारण ताब्यात

कोल्हापूरमध्ये गोकुळ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, बाजार समित्या आणि साखर कारखान्यांवर ज्यांचे नियंत्रण असते, त्यांच्याच हातात विधानसभा, लोकसभा, जिल्हा परिषद व महापालिकेचे राजकारण राहते. गोकुळच्या ताकतीवर राजकीय नेते जिल्ह्याचे राजकारण आपल्या मुठीत ठेवू शकतात. त्यामुळे जिल्ह्याच्या सत्ताकारणाचा 'गोकुळ' कणा बनला आहे.

महाविकासाची ताकद की महायुतीची बाजी

'गोकुळ' कोणाचा याच्या फैसला आज होणार आहे. महाविकास आघाडीकडून सतेज पाटील हे मैदानात आहे. ज्यांनासोबत घेऊन मागील वेळी त्यांनी सत्ता मिळवले ती मंत्री हसन मुश्रीफ आता महायुतीसोबत आहे. महायुतीचे सर्व घटक पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात सतेज पाटील यांना संधी की महायुतीचे नेत वरचढ याचा फैसला आज होणार आहे. पूर्वी राजकीय पक्षांचे जोडे बाजूला ठेवून गोकुळची सत्ता चालवली जात असे. मात्र, बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे राजकीय पक्षांचा थेट शिरकाव गोकुळमध्ये झाला आहे.

या दुधसंघाचे शेतकऱ्याची असलेल्या कनेक्ट आर्थिक उलाढाल पाहता ही ही केवळ एका दूध संघाची निवडणूक नसून, ती संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक सत्ताकारणाची नाडी आहे. त्यामुळे गोकुळवर वर्चस्व म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणात वर्चस्व असे समीकरण तयार झाले आहे. त्यासाठी आज लागणार निकाल हा महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांसाठी महत्त्वाचा आहे.

Gokul Election Analysis : Satej Patil, Hasan Mushrif Dhananjay Mahadik
Gokul Politics : 'गोकुळ'मधील घडामोडीची कुणकुण लागली, दौरे रद्द करत मुश्रीफ, कोरे, कदमांनी विशेष विमानाने मुंबई गाठली!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com