Arun Dongale officially resigns as Gokul Dairy Chairman Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul Election Results : गोकुळ निवडणुकीच्या निकालात मोठा ट्विस्ट, दोन माजी अध्यक्ष पिछेहाटीवर! मुश्रीफांची चिंता वाढली…

Gokul Election Arun Dongale : सर्वसाधारण गटातून महायुतीचे गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे, विश्वास पाटील पिछाडीवर आहेत.

Roshan More

Gokul News : कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. 'गोकुळ'मध्ये महायुतीचा अध्यक्ष हवा म्हणून अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास नकार देणारे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे हे पि‍छेहाटीवर आहेत.त्यासोबत अध्यक्ष विश्वास पाटील सुद्धा पिछाडीवर आहेत.

सर्वसाधारणमध्ये महायुती 14 जागांवर आघाडीवर तर समविचारी आघाडी 6 जागांवर आघाडीवर आहे. विशेष म्हणजे महायुतीचे माजी अध्यक्ष आणि मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र नाविद मुश्रीफ हे देखील पि‍छेहाटीवर आहेत.

सर्वसाधारण गटातून महायुतीचे गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे, विश्वास पाटील पिछाडीवर आहेत.

कोण बाजी मारणार?

सतेज पाटील विरुद्ध महायुती असे चित्र या निवडणुकीत आहे. मागील निवडणुकीत सतेज पाटलांनी मंत्री हसन मुश्रीफ यांनासोबत घेत, महाडिकांच्या सत्तेला सुरुंग लावला होता. मात्र, यावेळी मुश्रीफ हे महायुतीसोबत आहेत.

राखीव गटात समविचार पुढे

राखीव गटातून महायुतीची केवळ 1 तर समविचारी आघाडीचे चार जण आघाडीवर आहेत.शोमिका महाडिक महायुतीतुन तर अंजना रेडेकर, बयाजी शेळके, माजी आमदार राजू आवळे समविचारीतुन आघाडीवर आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT