Gokul Election : बाळूमामाची शपथ मोडल्यास ब्रेन स्ट्रोक, गोकुळच्या निवडणुकीत 'धार्मिक तांडव'; माजी आमदाराचे धक्कादायक विधान

K P Patil Balumama Oath : खासदारा महाडिक यांनी देखील ठरावधारकांना आव्हान करत म्हटले की, राज्यातील नेत्यांचं या निवडणुकीकडे लक्ष आहे.आमची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. चुकीचं काही करू नका
Gokul Election K P Patil Balumama Oath Controversy
Gokul Election K P Patil Balumama Oath Controversysarkarnama
Published on: 
Updated on: 

Gokul Election News : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत रोज देवाच्या शपथा घेण्यावरून वादंग निर्माण झाला आहे. ठराव धारकांवर महायुतीमधील नेत्यांकडून धार्मिक दबाव टाकला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. अशातच राधानगरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे नेते आणि माजी आमदार के पी पाटील यांनी प्रचाराच्या निमित्ताने ठराव धारकांवर शपथ घेण्यावरून अकलेचे तारे तोडले आहेत.

बाळूमामाची शपथ मोडल्यास ब्रेन स्ट्रोक आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.गेल्या निवडणुकीत ऐकाने बाळू मामाची शपथ मोडली. त्याच्या घराण्याला राजकीय हादरा बसला, असे धक्कादायक विधान भुदरगड तालुक्यातील श्री क्षेत्र आदमापूर येथे गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने ठराव धारकांच्या बैठकीत केले के पी पाटील यांनी केले.

राज्यातील नेत्यांचं या निवडणुकीकडे लक्ष आहे.आमची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. चुकीचं काही करू नका, असे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचा ठरावधारकांना दम दिला आहे. दरम्यान मतदानाआधी आदमापुर येथील बाळूमामा मंदिर परिसरात महायुती कडून शपथ दिली असल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

Gokul Election K P Patil Balumama Oath Controversy
Gokul election 2026 : राधानगरी, करवीर आणि पन्हाळा ठरणार गोकुळ विजयाचा टर्निंग पॉईंट; महायुतीला 'त्या' 1400 सभासदांची धास्ती

सतेज पाटलांवर निशाणा

मुश्रीफ यांनी देखील ठरावधारकांना देवीची शपथ देत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यावरून सतेज पाटील यांनी टीका केसी होती. त्यावरून मुश्रीफांनी प्रत्युत्तर देत सतेज पाटलांचे नाव न घेता म्हटले होते की, यापूर्वीही अनेक असे प्रयोग झाले आहेत. त्यांनी स्वतः जाऊन अनेक ठिकाणी शपथा घेतल्या आहेत

Gokul Election K P Patil Balumama Oath Controversy
Gokul Politics : 'गोकुळ'मधील घडामोडीची कुणकुण लागली, दौरे रद्द करत मुश्रीफ, कोरे, कदमांनी विशेष विमानाने मुंबई गाठली!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com