Satej Patil Politics : 'गोकुळ'च्या निकालात प्रचंड मोठी उलथापालथ झाली आहे, सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. पहिल्या दोन फेऱ्यामध्ये आघाडीवर असलेली महायुती आता मागे पडली आहे.
सतेज पाटलांची समविचारी आघाडी तब्बल 14 जागांवर आघाडीवर आहे. तर, महायुती ही 11 जागांवर आघाडीवर आहे. विशेष म्हणजे पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये आघाडीवर असणाऱ्या शौमिका महाडिक या देखील महायुतीमध्ये पिछाडीवर आहेत.
गोकुळच्या निकालांचा कल पाहात तब्बल तीन माजी अध्यक्ष डेंजर झोनमध्ये आहे. माजी अध्यक्ष अरुण डेंगळे, विश्वास पाटील यांच्यासह मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र, माजी अध्यक्ष नाविद मुश्रीफ हे देखील पिछाडीवर आहेत. जर निकालाचा कल असाच पुढे राहिला तर सतेज पाटील यांची समविचार आघाडी सहज सत्ता स्थापन करेल, मात्र, अजुनही उमेदवारांच्यामधील मतांचे अंतर कमी असल्याने निकाला काय लागणार याची प्रत्यक्षा करावी लागणार आहे.
सुरुवातीच्या कलांमद्ये सर्वसाधारणगटामध्ये महायुती 14 जागांवर आघाडी होती. तर समविचारी आघाडी 6 जागांवर आघाडीवर होती.त्यातही आरक्षित जागांवर सविचारीला चांगली आघाडी होती. मात्र, सुरुवातीचे कल पाहात महायुती बाजी मारेल, असे चित्र होते, मात्र, दुसऱ्या फेरीनंतर वातावरण बदलले आणि समविचारीचे मतदार आघाडीवर गेले.
ही निवडणुकीत महायुती विरुद्ध सतेज पाटील असे चित्र होते. महायुतीमधील नेत्यांनी ठरावधारांना शपथा दिल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सतेज पाटलांनी टीका केली होती. तर, मंत्री मुश्रीफ यांनी पाटील यांना प्रत्युत्तर देत मागील वेळी तुम्ही देखील शपथ घेतली होती, याची आठवण करून दिली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.