Gokul Seat Sharing: गोकुळ दूध संघामध्ये महायुतीमधील संस्था पात्र अपात्रतेचा वाद संपल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आणि शिवसेनेला अंतर्गत संघर्ष करावा लागणार आहे. त्यामुळे सत्ताधारी माजी संचालकांचा पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी कस लागणार आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत होणाऱ्या जागा वाटपाच्या फॉर्म्यूलाकडे लक्ष लागले आहे.
महायुतीचे जागावाटप हे मुख्यमंत्री फडणवीस तर महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावर आमदार सतेज पाटील निर्णय घेणार आहेत. त्यामुळे साहजिकच महायुतीतील नाराजांवर आमदार पाटील यांचं लक्ष् असणार आहे. तर दुसरीकडे महायुतीतील घटक पक्षाचे भवितव्य मुख्यमंत्र्यांच्या भेटीत ठरणार आहे.
महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपने शक्ती प्रदर्शन करत ठराव दाखल केले. यापूर्वी महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत ज्यांचे ठराव अधिक त्याला जागा वाटपामध्ये अधिक संधी असे सूत्र ठरल्यानुसार सर्वांनीच शक्ती प्रदर्शन करत ठराव जमा केले. आता जागा वाटपाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात असल्याने सर्व नेत्यांची बैठक मुख्यमंत्र्यांसोबत होणार आहे.
बुधवारी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने ही बैठक देखील लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व इच्छुकांनी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली आहे. महायुतीमध्ये असणाऱ्या घटक पक्षातील संचालकांना पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र नव्या राजकीय समीकरणा नुसार शिवसेनेला किती राष्ट्रवादी काँग्रेसला किती आणि भाजपला किती जागा मिळणार? यावर इच्छुकांचे गणित अवलंबून आहे. शिवाय सर्वच घटक पक्षातील नेत्यांना तालुकास्तरावर एक-दोन जागा हवी असल्याने उमेदवारी देताना नेत्यांची देखील कसरत पाहायला मिळणार आहे.
तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये एकतर्फे निर्णय घेण्यास आमदार सतेज पाटील सक्षम असल्याने प्रचारात त्यांना आघाडी मिळणार आहे. पण महायुतीमध्ये उमेदवारी आणि जागा वाटपामध्येच अधिक वेळ खर्च केल्यास त्यांना देखील याचा फटका बसू शकतो.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडे अधिक ठरावा आहेत या दोघांनाही जागा वाटपामध्ये मोठा हिस्सा मेळावा अशी अपेक्षा आहे. मात्र भाजप देखील अधिक जागा मिळवण्यासाठी आग्रह आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच हातात जागा वाटपाचा फॉर्म्युला असल्याने यामध्ये मोठा भाऊ कोण ठरणार? त्यांच्याकडून कोणाला न्याय दिला जाणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.