Gokul Dudh Mahasangh Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul Dudh Sangh Election: गोकुळ निवडणुकीच्या तोंडावर सतेज पाटलांना धक्का; 'हा' बडा नेता लागला मुश्रीफांच्या गळाला

Gokul Election: Setback for Congress MLA Satej Patil: स्थानिक राजकारण वेगळे आणि सहकारातील राजकारण वेगळे असा निर्णय घेत ए.वाय. पाटील हे हसन मुश्रीफ यांच्यासोबत गोकुळच्या राजकारणात राहणार आहेत.

Rahul Gadkar

Kolhapur News,7 march 2026: लोकसभा निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्यासोबत राहिलेले कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक ए.वाय.पाटील यांनी सतेज पाटील यांनाच धक्का देण्याचा निर्णय घेतला आहे.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या तोंडावर ए. वाय. पाटील यांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटातून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांना हा धक्का समजला जातो.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना ए वाय पाटील यांनी पाठिंबा देत भविष्याच्या राजकारणात सतेज पाटील यांच्यासोबत राहण्याची घोषणा केली होती. विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र बंडखोरी करत त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्यासोबत राहून राधानगरी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या तीन जागांवर आणि पंचायत समितीच्या सहा जागांवर विजय मिळवत राधानगरी तालुक्यावर वर्चस्व ठेवले होते.

त्यामुळे आगामी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत ए. वाय. पाटील सतेज पाटील यांच्यासोबत राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र स्थानिक राजकारण वेगळे आणि सहकारातील राजकारण वेगळे असा निर्णय घेत ए.वाय. पाटील हे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत गोकुळच्या राजकारणात राहणार आहेत.

मागील निवडणुकीत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या गटातून ए. वाय. पाटील यांना उमेदवारीची घोषणा केली होती. मात्र ए. वाय. पाटील यांनी कार्यकर्ता किसन चौगुले यांना संधी देण्याचा निर्णय घेतला होता. पण गोकुळ मध्ये संचालक होतात चौगुले यांनी ए. वाय. पाटील यांची साथ सोडून के.पी. पाटील यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीत यंदा स्वतः ए वाय पाटील असणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT