Gokul Election | Supreme Court Order | Contempt Petition Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul Election : गोकुळची निवडणूक लवकर घ्या; अन्यथा 91 व्या दिवशी अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा

Supreme Court Order to Gokul : 'गोकुळ निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने ६ मे २०२६ ला ही निवडणूक 'आजपासून ९० दिवसांच्या आत' घेण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. ज्येष्ठ सरकारी वकील सिद्धार्थ धर्माधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे त्या दिवसापासून ९० दिवसांच्या आत निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते.'

Rahul Gadkar

Kolhapur News, 07 Jul : गोकुळची निवडणूक 'आजपासून ९० दिवसांच्या आत घ्या' असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तीन ऑगस्टला ही मुदत संपते. तत्पूर्वी मतदान प्रक्रिया सुरू न केल्यास चार ऑगस्टला म्हणजे ९१ व्या दिवशी अवमान याचिका दाखल करणार आहे. संस्थेने अधिकाऱ्यांच्या वेळ काढूपणावर ठपका ठेवला आहे, असा इशारा याचिकाकर्ते पुंगाव, ता. राधानगरीमधील श्री स्वामी समर्थ सहकारी दूध व्यावसायिक संस्थेने पत्रकाद्वारे दिला.

पत्रकात म्हटले आहे की, गोकुळ निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने ६ मे २०२६ ला ही निवडणूक 'आजपासून ९० दिवसांच्या आत' घेण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. ज्येष्ठ सरकारी वकील सिद्धार्थ धर्माधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे त्या दिवसापासून ९० दिवसांच्या आत निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. न्यायालयीन आदेश प्राप्त होताच, एका आठवड्याने निवडणूक प्राधिकरणाने विधी व न्याय विभागाचा सल्ला मागितला.

त्यावेळी सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ सरकारी वकील धर्माधिकारी यांनी काय निवेदन केले होते, याबाबत त्यांच्याकडूनच सल्ला घ्यावा,' असे उत्तर निवडणूक प्राधिकरणाला दिले. निवडणूक प्राधिकरणाने अॅड. धर्माधिकारी यांना याबद्दलची विचारणा केली. त्यावर त्यांनी 'मी ९० दिवसांत निवडणूक घेण्याचे सांगितले होते. तत्काळ गोकुळची निवडणूक सुरू करा आणि अवसायानातील संस्थांचा निकाल हा लवकरात लवकर द्या,' असे मत त्यांनी कळविले होते.

हे प्राप्त होताच निवडणूक प्राधिकरणाने आदेश काढले. परंतु, यासाठी जवळजवळ तीन आठवड्यांचा कालावधी लोटला गेला होता. यामध्ये मुद्दाम, जाणूनबुजून तीन आठवड्यांचा कालावधी घालवला. हाच कायदेशीर सल्ला जर ई-मेल द्वारे विचारला असता, तर ते उत्तर अगदी दोन दिवसांतच मिळाले असते. आजही या निवडणुका लवकर घेण्याबाबत अधिकारी तत्परता दाखवत नाहीत.

कारण, ठराव आल्यानंतर कच्ची यादी प्रसिद्ध करणे, पक्क्या यादीचा कार्यक्रम जाहीर करणे आणि निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणे हे अपेक्षित होते. मुद्दाम वेळ काढण्याचं काम हे सगळे अधिकारी करत आहेत.

यासाठी या सर्व अधिकाऱ्यांच्या विरुद्ध आम्ही ९१ व्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात 'सर्वोच्च न्यायालयाची बेअदबी केल्याबद्दल खटला' दाखल करून या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करणार आहोत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT