Hasan Mushrif Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul Election: 'गोकुळ'च्या वाढलेल्या 1200 संस्था प्रकरणात मोठा ट्विस्ट : सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे आदेश; तर याचिका फेटाळल्याचा प्रतिवाद्यांचा दावा

Supreme Court Rejects Hasan Mushrif Petition: याचिकेमध्ये प्रतिवादी करण्यात आलेल्या प्रकाश बेलवाडे यांच्याकडून ही माहिती खोडून काढत मंत्री हसन मुश्रीफ यांची याचिका फेटाळण्यात आली असल्याचा दावा केला आहे.

Rahul Gadkar

Gokul News : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात 'गोकुळ'च्या वाढलेल्या 1200 संस्थांच्या पात्रतेबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचला महत्त्वाचे आदेश दिले असल्याची माहिती गोकुळचे वकील पृथ्वीराज पाटील यांनी दिली.

त्याचवेळी या याचिकेमध्ये प्रतिवादी करण्यात आलेल्या प्रकाश बेलवाडे यांच्याकडून ही माहिती खोडून काढत मंत्री हसन मुश्रीफ यांची याचिका फेटाळण्यात आली असल्याचा दावा केला आहे. सुप्रीम कोर्टाने कोल्हापूर सर्किट बेंचला आदेश दिल्याची माहिती असल्यामुळे 17 मार्च रोजी होणाऱ्या सुनावणीला गोकुळमधील बाराशे सभासदांबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

आजरा तालुक्यातील वडकशिवालेमधील महादेव दूध संस्थेचे प्रकाश बेलवाडे यांनी 1हजार 200 संस्थांना पात्र ठरविण्याऱ्या तत्कालीन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. वाढलेल्या 1 हजार 200 संस्था बोगस असून त्या रद्द कराव्यात अशी बेलवाडे यांची मागणी आहे. याबाबत सर्किट बेंचमध्ये सुनावणी सुरू असताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्वोच्च न्यायालयाची पायरी चढली होती.

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सूर्य कांत यांच्यासमोर गोकुळ प्रशासनाकडून मंत्री हसन मुश्रीफ यांनी दाखल केलेले परिपत्रक, 1200 सभासदांच्या नोंदणीची संपूर्ण माहिती ठेवण्यात आली. केवळ मंत्री विखे पाटील यांच्या आदेशावरच कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुनावणी सुरू आहे. मात्र या 1200 संस्थांचेही म्हणणे ऐकून घेणे गरजेचे आहे, अशी विनंती न्यायालयासमोर केली असल्याची माहिती गोकुळचे न्यायविभागाचे पृथ्वीराज पाटील यांनी माहिती दिली.

सर्वोच्च न्यायालयाकडून कोल्हापूर सर्किट बेंचला, "या बाराशे सभासदांचे म्हणणे ऐकून घ्या. हे प्रकरण तातडीने निकालात काढा," असे आदेश दिली असल्याची माहिती पृथ्वीराज पाटील यांनी दिली. त्याचवेळी मंत्री मुश्रीफ यांनी दाखल केलेल्या याचिकेचे प्रतिवादी प्रकाश बेलवाडे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली असल्याचा दावा केला आहे. पण शिवाय गोकुळकडून देण्यात आलेली माहिती खोडून काढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT