Anganwadi Employee News: अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षितता लाभणार! आता PF मिळणार

Anganwadi Workers EPF News:आरोग्य, पोषण आणि महिला-बालकल्याण क्षेत्रात हे कर्मचारी अनेक वर्षांपासून मोठे योगदान देत होते मात्र त्यांना सामाजिक सुरक्षा मिळत नव्हती. या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षितता लाभणार आहे.
Anganwadi Workers EPF News
Anganwadi Workers EPF NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 11 March 2026: राज्यातील अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी आणि अर्धवेळ परिचारिका म्हणून विविध सरकारी योजनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. ‘सीटू’ने यासंदर्भात सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला होता.

आता या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी (EPF) आणि पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे. सुमारे ९ हजार १५ कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) आणि पेन्शन योजना लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निकाल प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त अमित वशिष्ठ यांनी दिला.

आर्थिक सुरक्षितता लाभणार

आरोग्य, पोषण आणि महिला-बालकल्याण क्षेत्रात हे कर्मचारी अनेक वर्षांपासून मोठे योगदान देत होते मात्र त्यांना सामाजिक सुरक्षा मिळत नव्हती. या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षितता लाभणार आहे. यामुळे अंगणवाडी, आशा, कर्मचारी आणि अर्धवेळ परिचारिका म्हणून महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महत्त्वाचा निर्णय

सरकारी योजनामध्ये काम करीत असल्याने खासगी क्षेत्राचे नियम लागू होत नव्हते आणि कायमस्वरूपी कर्मचारी नसल्यामुळे सरकारी PF चा लाभही मिळत नव्हता. त्यामुळे हे कर्मचारी अनेक वर्षे अडचणीत होते. अमित वशिष्ठ यांनी जिल्हा परिषदेच्या विरोधामध्ये म्हणजेच महाराष्ट्र सरकारच्या विरोधामध्ये निकाल दिलेला आहे .

Anganwadi Workers EPF News
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण होणार ‘लखपती’; बिनव्याजी कर्ज मिळणार! जामीनदार, CIBILस्कोअरची अट नाही; संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या!

सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सचे (CITU) अध्यक्ष अजित अभ्यंकर आणि सरचिटणीस वसंत पवार यांनी कर्मचाऱ्यांच्या वतीने कायदेशीर लढा दिला. भविष्य निर्वाह निधी आयुक्तांकडे सादर केलेल्या कायदेशीर मुद्द्यांवरून हा महत्त्वाचा निर्णय देण्यात आला.

Anganwadi Workers EPF News
Ambadas Danve News: अंबादास दानवेंनी भाजप सभापतीपदाच्या उमेदवाराची धरली गचांडी! भाजपाकडून सदस्य पळवा पळवी...

रक्कम 60 दिवसात जमा करा

प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त अमित वशिष्ठ यांनी दिलेल्या निर्णयानुसार, पुणे जिल्हा परिषदेने कर्मचाऱ्यांचे आणि नियुक्ती करणाऱ्या आस्थापनांचे योगदान मिळून जवळपास १०८४ कोटी १३ लाख रुपये येत्या ६० दिवसांत जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com